शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

फेब्रुवारीपासून कॅसिनोंमध्ये जाण्यास गोमंतकीयांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 2:40 PM

राज्यातील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंमध्ये जाण्यास येत्या दि. 1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना बंदी असेल.

पणजी - राज्यातील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंमध्ये जाण्यास येत्या दि. 1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना बंदी असेल. सरकारने गेमिंग कमिशन स्थापन करण्याचे ठरवले आहे. त्याविषयीची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे.मांडवी नदीत पाच कॅसिनो आहेत. जहाजांमधील कॅसिनोंमध्ये देश- विदेशातील पर्यटक जातात व कॅसिनो जुगार खेळतात. त्याचबरोबर हजारो गोमंतकीयांनाही कॅसिनोचे व्यसन लागले आहे. अनेक गोमंतकीय कुटूंबेही कॅसिनोमुळे उध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यास बंदी लागू करावी अशी मागणी आमदार व काही मंत्र्यांकडून सातत्याने केली जात होते. कळंगुट मतदारसंघाचे आमदार तथा बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यास बंदी लागू करायला हवी अशी मागणी लोबो यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. गोवा विधानसभेतही 2019 साली याविषयी आश्वासन दिले गेले होते पण त्याची पूर्तता कधी झाली नव्हती. कॅसिनोंवर रोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. मांडवी नदीतून कॅसिनो हटविले जावेत अशी मागणीही काही आमदार करत आहेत. मात्र सरकार तूर्त गोमंतकीयांना बंदी लागू करण्याच्याच विषयावर लक्ष देईल, असे सुत्रंनी सांगितले.गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी अधिकृत घोषणा केली. गोव्याचे वाणिज्य कर आयुक्त हेच गेमिंग कमिशनर म्हणून काम पाहतील. आपण त्याविषयीच्या फाईलवर प्रक्रिया सुरू केली आहे. गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यापासून बंदी लागू होईल. दि. 1 फेब्रुवारीपासून बंदीची अंमलबजावणी गेमिंग कमिशनर करून घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कॅसिनोंमध्ये जे कुणी जातील त्यांचे ओळखपत्र मागण्याचा अधिकार हा गेमिंग कमिशनरला असेल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार