शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

फरार अटालाला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलीस उत्तराखंडमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:56 IST

गोव्यात एका रशियन नागरिकावर खुनी हल्ला करुन फरार झालेला कुप्रसिद्ध इस्रायली ड्रग डिलर यानीव बेनाईम उर्फ अटाला याला उत्तराखंड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी अंजुणा पोलिसांचे पथक उत्तराखंडात दाखल झाले आहे.

ठळक मुद्दे गोव्यात एका रशियन नागरिकावर खुनी हल्ला करुन फरार झालेला कुप्रसिद्ध इस्रायली ड्रग डिलर यानीव बेनाईम उर्फ अटाला याला उत्तराखंड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी अंजुणा पोलिसांचे पथक उत्तराखंडात दाखल झाले आहे. अटालाला गोव्यात आणून त्याच्या विरोधात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती अंजुणाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली.अटाला विरोधात उत्तराखंडातही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव केल्यामुळे गुन्हा नोंद झाला आहे.

मडगाव - गोव्यात एका रशियन नागरिकावर खुनी हल्ला करुन फरार झालेला कुप्रसिद्ध इस्रायली ड्रग डिलर यानीव बेनाईम उर्फ अटाला याला उत्तराखंड पोलिसांनीअटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी अंजुणा पोलिसांचे पथक उत्तराखंडात दाखल झाले आहे. अटालाला गोव्यात आणून त्याच्या विरोधात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती अंजुणाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली.

दरम्यान, अटाला विरोधात उत्तराखंडातही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव केल्यामुळे गुन्हा नोंद झाला आहे. नेपाळात पळून जाण्याच्या तयारीत असताना इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटालाची अंमलीपदार्थ व्यवहारातील पार्श्वभूमी पाहून ड्रग्स डिलिंगसाठीच तो नेपाळात तर जात नव्हता ना याचीही उत्तराखंडचे पोलीस चौकशी करत आहेत.

मागची कित्येक वर्षे अंजुणा परिसरात बेकायदेशीर वास्तव करुन असलेल्या अटालाने 24 एप्रिल रोजी एडवर्ड नावाच्या एका रशियन नागरिकावर सुरी हल्ला केला होता. त्याच्या अन्य दोन साथीदारांनीही त्या रशियन नागरिकावर लोखंडी कांबीनी हल्ला केला होता. सध्या त्या रशियन नागरिकावर गोव्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या हल्ल्यानंतर आपल्याला अटक होणार या भीतीने अटाला फरार झाला होता. कदाचित तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता गृहित धरुन गोवा पोलिसांनी देशातील सगळ्या सीमावर्ती भागातील पोलिसांना सतर्क केले होते. मंगळवारी रात्री अटाला नेपाळात जाण्याच्या तयारीत असताना इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे कुठलीही वैध कागदपत्रे नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी केली असता गोव्यात आपल्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी अंजुणा पोलिसांना ही खबर दिल्यानंतर बुधवारी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले.

अटाला याचे नाव यापूर्वी गोव्यातील राजकारण्यांचे ड्रग्स व्यवसायात संबंध असल्याचे वक्तव्य केल्यामुळे सर्वप्रथम चर्चेत आले होते. यापूर्वी त्याला अंमलीपदार्थ विषयक गुन्हय़ात अटकही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने त्याला निदरेष मुक्त केले होते. त्यानंतर अटालाचे वास्तव्य गोव्यातच होते. हल्लीच एका स्थानिक जलक्रीडा चालकाकडेही वाद करुन अटालाने त्याच्या कामगारावर हल्ला केला होता. त्यानंतर रशियन नागरिकावर हल्ला केल्यामुळे पोलिसांच्या दफ्तरात अटालाच्या नावाची पुन्हा एकदा नोंद झाली होती. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसArrestअटक