मंत्री विश्वजीत यांनी ‘त्या’ मुलाच्या घरी भेट देऊन मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:02 IST2026-05-19T14:01:02+5:302026-05-19T14:02:21+5:30

सरकारी रुग्णालयात नीट उपचार न मिळाल्याने त्या मुलाच्या पायाला गँगरीन झाले व परिणामी पाय कापावा लागला.

goa minister vishwajit visits that boy house and apologizes | मंत्री विश्वजीत यांनी ‘त्या’ मुलाच्या घरी भेट देऊन मागितली माफी

मंत्री विश्वजीत यांनी ‘त्या’ मुलाच्या घरी भेट देऊन मागितली माफी

लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी : सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील एका अकरा वर्षीय मुलाला वाळपई येथील सरकारी रुग्णालयात नीट उपचार न मिळाल्याने त्या मुलाच्या पायाला गँगरीन झाले व परिणामी पाय कापावा लागला. याबाबत राज्यभर खळबळ उडाली होती. 

सोमवारी मंत्री विश्वजीत राणे यांनी या मुलाच्या घरी भेट दिली. मुलाशी व कुटुंबीयांशी संवाद साधला. योग्य प्रकारची वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मंत्री राणे यांनी त्या मुलाच्या कुटुंबीयांची माफी मागितली. मुलाला व कुटुंबीयांना झालेल्या त्रासाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, असेही राणे यांनी कुटुंबीयांना सांगितले.

गौरव सावर्डेकर ह्या मुलाचा पाय फॅक्चर झाला होता. त्याच्यावर वाळपई येथील रुग्णालयात पायावर प्लास्टरिंग घालताना डॉक्टरांनी नीट लक्ष ठेवले नाही. जखम पुढे गंभीर बनली होती.

वैद्यकीय अधिकाऱ्याला केले निलंबित

वाळपईच्या सरकारी इस्पितळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याना सेवेतून कायमचे निलंबित केले गेले. तसेच या मुलाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची घोषणा मंत्री राणे यांनी केली होती. राणे यांनी काल काही ग्रामस्थांसोबत या मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेतली व चर्चा केली. झालेला प्रकार कुणालाच मान्य नाही असे राणे यांनी सांगितले व आपण कुटुंबाची माफी मागत असल्याचे स्पष्ट केले. सरकार मुलाला आवश्यक मदत करील असेही ते म्हणाले.
 

Web Title: goa minister vishwajit visits that boy house and apologizes