शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: खबरदार! प्रचार कराल तर नोकरी गमवाल; ‘त्या’ कर्मचाऱ्यांना गोवा सरकारचे कडक निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 10:00 IST

Goa Election 2022: प्रचार करताना आढळल्यास कामावरून काढून टाकले जाईल, असे परिपत्रक काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताही पक्ष वा उमेदवारासाठी प्रचार न करण्याचे कडक निर्देश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रचार करताना आढळल्यास कामावरून काढून टाकले जाईल, असे परिपत्रक महिला आणि बालविकास खात्याने जारी केले आहे. मात्र, या पत्रकाला जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधी प्रचार होण्याची भीती असल्यानेच हे परिपत्रक जारी केल्याचा आरोप करत ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकाचा निषेध केला आहे. 

राज्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने विविध पक्षांकडून आणि उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. काही ठिकाणी शिक्षकांना उमेदवार प्रचारात गुंतवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या अनुषंगाने आता महिला आणि बालविकास खात्याने परिपत्रक जारी केले आहे. खात्याच्या संचालक दीपाली नाईक यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचारी आणि हेल्पर यांनी कुठल्याही निवडणूक प्रचारात सहभागी होऊ नये. एखादा अंगणवाडी कर्मचारी/हेल्पर कुठल्याही पक्षाचा वा उमेदवाराचा प्रचार करताना आढळल्यास त्यास तातडीने कामावरून काढून टाकले जाईल. 

महिला आणि बालविकास खात्याने जारी केलेल्या या परिपत्रकाला काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी म्हटले आहे की, ‘अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधात प्रचार केला तर त्याचा जबर फटका आगामी निवडणुकांमध्ये बसेल. त्यामुळे सरकार घाबरले आहे आणि म्हणून वरील परिपत्रक जारी केले आहे. आमचा या परिपत्रकाला विरोध आहे. एका बाजूने खाते त्यांना स्वेच्छा कर्मचारी म्हणतात आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करतात,’ असेही ते म्हणाले. 

‘अंगणवाडी कर्मचारी आणि हेल्पर यांना राजकीय बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपने बोलावले होते. त्यांना अशा बैठकांमध्ये सहभागी होता येते का, हा एक गंभीर प्रश्न आहे. खात्याचे संचालक सरकारच्या एजंटप्रमाणे काम करत आहे का?,’ असा सवालही शिरोडकर यांनी उपस्थित केला. खात्याने यावर स्पष्टीकरण द्यावे आणि जर खात्याकडे स्पष्टीकरण नसेल तर त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना सरकारचे सर्व लाभ द्यावेत, अशी मागणी शिरोडकर यांनी केली. खात्याने काढलेल्या परिपत्रकाचा त्यांनी निषेध केला. खात्याचे संचालक आणि त्यांनी काढलेल्या परिपत्रकाच्या विरोधात कायदेशीर लढा देऊ, असेही ॲड. शिरोडकर म्हणाले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२State Governmentराज्य सरकार