पश्चिम बंगालच्या निकालातून गोव्याला धडा: विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:48 IST2026-05-05T13:48:14+5:302026-05-05T13:48:36+5:30
गोव्यातील जनतेने सतर्क राहून अशा प्रकारच्या डावपेचांना बळी पडू नये, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.

पश्चिम बंगालच्या निकालातून गोव्याला धडा: विजय सरदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: देशातील अलीकडील निवडणुकांचे निकाल गोव्यासाठी महत्त्वाचे धडे देणारे ठरत आहे. यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचाही समावेश असल्याचे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.
पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही. सत्ताधारी पक्ष सत्तेत राहण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतात, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने सतर्क राहून अशा प्रकारच्या डावपेचांना बळी पडू नये, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.
सरदेसाई म्हणाले, की गोव्यात सत्ताधारी सरकारविरोधात नाराजी असून विरोधकांच्या बाजूने जनतेची लाट दिसून येत आहे. या चित्रामध्ये कुठलाही बदल होता कामा नये. केरळमधील निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे.
तामिळनाडूमध्ये विजय थलपती यांच्या पक्षाचा उदय झाला आहे. स्थानिक प्रश्नांवर आधारित, धाडसी आणि नवीन राजकारणाला लोकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे यावरून दिसून येते. हीच विचारसरणी गोवा फॉरवर्ड पक्षाची असून, भविष्यात गोव्यातही अशा राजकारणाला बळ मिळेल.