शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जीसीए त्रिकुटाची जामीनवर सुटका

By admin | Updated: June 24, 2016 20:46 IST

निधीच्या अफरातफर प्रकरणात अटक करण्यात तीन्ही गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) तिन्ही पदाधिकाऱ्यांना पणजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २४ - निधीच्या अफरातफर प्रकरणात अटक करण्यात तीन्ही गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) तिन्ही पदाधिकाऱ्यांना पणजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीनवर मुक्त केले.
जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांच्या जामीन अर्जावर निवाडा देताना तिघांनाही मुक्त केले. त्यांना 4 लाख रुपयांच्या वैयक्तिक  हमीवर आणि 4 दिवस पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागात हजेरी लावण्याच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.  रविवार पासून सतत 4 दिवस सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 यावेळेत त्यांना पणजी येथील आर्थिक  गुन्हे  विभागात ऊपस्थित रहावे लागणार आहे.
तिघांविरुद्द नोंदविण्यात आलेले गुन्हे,  लावण्यात आलेली कलमे , न्यायालयात झालेले ऊभय बजूंचे  युक्तिवाद आणि संशयितांनी आतापर्यंत कोठडीत काढलेले दिवस या गोष्टी विचारात घेवून न्यायमूर्ती विजयलक्ष्मी शिवोलकर यांनी हा निवाडा दिला.  
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेला 3.13 कोटी रुपये निधी अनाधिकृत खाते खोलून निधीची अफरातफर केल्याचा तिघांवरही ठपका असून त्याच कारणासाठी त्यांना अटक करण्यात आली होती.
 
15 दिवस जीसीएत  मज्जाव
तिन्ही संशयितांना जामीन मंजूर करतानाच व्यायाम याने त्यांना 15 दिवस पर्यत  न्यायालयाच्या परवानगीशिवाय जीसीएत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या काळात  जीसीएच्या कोणत्याही कार्यक्रमात  सहभागी होण्यास बंदी घातली आहे. साक्षिदारांना धमकावण्यासारखे प्रकार न करण्याचीही समज देण्यात आली आहे.