शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

GCA घोटाळा - बीसीसीआय गोवा पोलिसांना देणार १० वर्षांतील माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 20:05 IST

गोवा क्रिकेट असोसिएशन घोटाळा प्रकरणातील तपासकामात पोलिसांना आवश्यक असलेली सर्व माहिती देण्याचे आश्वासन बीसीसीआयने गोवा पोलिसांना दिले आहे

ऑनलाइन लोकमत - 
पणजी, दि. 25 - गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) घोटाळा प्रकरणातील तपासकामात पोलिसांना आवश्यक असलेली सर्व माहिती देण्याचे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गोवा पोलिसांना दिले आहे.  परंतु १० वर्षांची माहिती सुपूर्द करण्यासाठी काहीसा वेळ लागणार असल्यामुळे त्यासाठी मंडळाने मूदत मागितली आहे. 
 
जीसीएला अनुदानस्वरूप देण्यात आलेल्या १० वर्षांच्या काळाची सविस्तर माहिती देण्याची तयारी बीसीसीआयने गोवा पोलिसांच्या गुन्हा आर्थिक विभागाच्या पोलिसांना दिली आहे. एवढी विस्तृत माहिती देण्यासाठी काहीसा वेळ लागणार असल्यामुळे मुदत मागितली आहे. दरम्यान तपास कामासाठी गोव्याहून मुंबईला गेलेले आर्थिक गुन्हा विभागाचे पथक आपली मोहीम जवळ जवळ फत्ते करून  गोव्यात आले. मागितलेली माहिती बीसीसीआयकडून पोलिसांना ईमेलद्वारेही पाठविली जाणे शक्य आहे. परंतु बीसीसीआयचे सचीव अजय शिर्के यांची या प्रकरणात जबानीही नोंदविली जाणार आहे. त्यामुळे पोलीस पथकाला एक तर पुन्हा मुंबईला जावे लागणार किंवा शिर्के यांना त्यासाठी गोव्यात बोलाविण्यात येणार आहे. 
 
मुंबईला गेलेल्या पोलिसांच्या तुकडीने एकंदरीत अफरातफरीची सविस्तर माहिती बीसीसीआयला दिली. बीसीसीआयने पाठविलेल्या पैशांचा गैरवापर भविष्यात होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची सूचनाही बीसीसीआयला करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
 
दरम्यान अफरातफर प्रकरणासाठी अटक करण्यात आलेले प्रमुख संशयित जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचीव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांची शुक्रवारी जामीनवर सुटका करण्यात आल्यानंतर न्यायालयाच्या अटींनुसार तिघेही संशयित शनिवारी सकाळी ९.३० वाजता आर्थिक गुन्हा विभागात हजर राहिले. त्यांना अधुन मधुन आत बोलावून प्रश्न करण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू ठेवला होता. संध्याकाळी ५.३० वाजता ते तेथून निघाले.