शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

थर्ड फ्रंटसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: June 16, 2015 00:59 IST

पणजी : भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांकडून अपेक्षाभंग झाल्याची भावना गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही राजकारणी थर्ड फ्रंट स्थापन

पणजी : भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांकडून अपेक्षाभंग झाल्याची भावना गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही राजकारणी थर्ड फ्रंट स्थापन करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यात काही आमदारांचाही समावेश आहे. काँग्रेसचे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे २०१७च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून नियोजित थर्ड फ्रंटमध्ये सहभागी होण्याच्यादृष्टीने तयारीत आहेत.२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात थर्ड फ्रंट आकाराला येणार आहे. त्यादृष्टीने काही आमदारांमध्ये बोलणी सुरू झाली आहेत. भाजपचे आमदार मायकल लोबो हेही पक्षात खूप अस्वस्थ असून ते देखील थर्ड फ्रंटच्या गळाला लागू शकतात, अशी माहिती मिळाली. काँग्रेसचे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्यावर नाराज आहेत. फालेरो हे चर्चिल आलेमाव यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन विधानसभेचे तिकीट देण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा आमदारांच्या एका गटात सुरू आहे. काँग्रेस पक्ष जर जुन्याच चेहऱ्यांना घेऊन २०१७ची निवडणूक लढवणार असेल, तर आपण काँग्रेस पक्ष सोडेन व थर्ड फ्रंटचा पर्याय स्वीकारीन, असे रेजिनाल्ड आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत.रेजिनाल्ड व नियोजित थर्ड फ्रंडचे जनक आमदार विजय सरदेसाई यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. या प्रतिनिधीने रेजिनाल्ड यांना थर्ड फ्रंटविषयी सोमवारी विचारले असता, आपण अजून निर्णय घेतलेला नाही, एवढेच ते म्हणाले. मात्र, रेजिनाल्ड यांनी मानसिक तयारी आता चालविली असल्याची माहिती त्यांच्या नजीकच्या काही कार्यकर्त्यांकडून प्राप्त झाली. (खास प्रतिनिधी)