शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चार आमदारांचा पाठिंबा

By admin | Updated: December 10, 2014 01:06 IST

पणजी : उपोषणकर्त्या आंदोलकांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेस चार आमदारांनी तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी उपस्थिती लावून पाठिंबा जाहीर केला.

पणजी : उपोषणकर्त्या आंदोलकांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेस चार आमदारांनी तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी उपस्थिती लावून पाठिंबा जाहीर केला. सत्ताधारी आमदार विष्णू वाघ यांनी या वेळी स्वत:च्याच सरकारवर तोंडसुख घेतले. या असंवेदनशील सरकारचा घटक म्हणवून घेण्यास आपल्याला लाज वाटते, असे ते उद्वेगाने म्हणाले. काँग्रेसचे समर्थन जाहीर करताना लुईझिन यांनी गोव्यातील तमाम जनतेने या आंदोलनास पााठिंबा द्यावा, असे आवाहन केले. राष्ट्रवादीनेही पाठिंबा जाहीर केला असून बुधवारपासून आंदोलन व्यापक केले जाईल. समितीतील सातजण बेमुदत उपोषणास बसतील, तसेच आंदोलनाच्या पुढील टप्प्यात गावागावांत कोपरा बैठका घेतल्या जातील. काँग्रेसचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, पांडुरंग मडकईकर, अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी पाठिंबा देताना आपापल्या मतदारसंघातील लोकही तुमच्यासोबत राहतील, अशी ग्वाही आंदोलकांना दिली. वाघ स्वकीयांनाच उघडे पाडताना म्हणाले की, आंदोलक बंदर कप्तान खात्याच्या जेटीसमोर उपोषण करीत होते, तेव्हा मांडवी हॉटेलमध्ये भाजप आमदार, मंत्री जेवणावळी झोडत होते. आंदोलकांविषयी कळवळा होता म्हणून या जेवणावळींपासून आपण दूर राहिलो. काँग्रेस सत्तेवर असताना कोणी आंदोलन केले की, भाजप नेते येऊन पाठिंबा देत असत. आता सत्ता मिळाल्यावर ते बदलले. आपण येथे भाजपचा आमदार म्हणून नव्हे, तर माणुसकी जपणारा संवेदनशील लेखक म्हणून उपस्थित आहे. खरे तर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांकरवी नव्हे, तर स्वत: आंदोलकांसमोर येऊन आश्वासन द्यायला हवे होते; परंतु तसे झालेले दिसत नाही. आंदोलक उपोषणकर्त्यांच्या पाठीशी आपण अखेरपर्यंत राहीन, असे त्यांनी जाहीर केले. भाजपचे महामंत्री सतीश धोंड यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. (पान २ वर)