शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीपासून ए बी सी डी

By admin | Updated: July 3, 2014 01:17 IST

पणजी : सरकारचे अनुदान घेणाऱ्या कोकणी-मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून एक विषय मराठीतून शिकविणे सक्तीचे करणारी तरतूद सरकारने माध्यम धोरणात केली आहे.

पणजी : सरकारचे अनुदान घेणाऱ्या कोकणी-मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून एक विषय मराठीतून शिकविणे सक्तीचे करणारी तरतूद सरकारने माध्यम धोरणात केली आहे. तसेच अल्पसंख्याकांच्या शाळांनी इंग्रजी माध्यम स्वीकारले, तरी पहिलीपासून त्यांना कोकणी किंवा मराठीतील एक विषय मुलांना शिकविणे सक्तीचे असेल. मंत्रिमंडळाच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत सुधारित माध्यम धोरणास मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नवे माध्यम धोरण जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या शाळांना कोणतेही माध्यम स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांनी इंग्रजी माध्यम स्वीकारले, तर त्यांना पहिलीपासून कोकणी किंवा मराठी यापैकी एक विषय मुलांना शिकवावा लागेल. तसेच अन्य विषयांसाठी इंग्रजीबरोबरच कोकणी किंवा मराठी भाषेतील द्विभाषिक पुस्तके वापरावी लागतील. मुख्यमंत्री म्हणाले की, कर्नाटकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतर गोवा सरकारने शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी थोडे बदल करून अनुदान व शाळांची मान्यता असे दोन स्वतंत्र विभाग केले आहेत. कुणाला जर इंग्रजी माध्यमातून शिकायचे असेल, तर ते शिक्षण सरकार नाकारू शकत नाही. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यास महत्त्व द्यायला हवे; पण काहीजणांना माध्यम निवडीचे स्वातंत्र्यही द्यावे लागते. राज्यात शाळांचे मॅपिंग केले जाणार आहे. तोपर्यंत नव्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली जाणार नाही. प्रत्येक विद्यालयाने शेजारील मुलांना अगोदर प्रवेश द्यावा, असेही धोरण स्वीकारले जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या काही इंग्रजी शाळा सरकारचे अनुदान न घेता चालविल्या जातात, त्यांनाही शिक्षण खात्याची मान्यता मिळविण्यासाठी पहिलीपासून कोकणी किंवा मराठी यापैकी एक विषय सक्तीने शिकवावा लागेल. याच शैक्षणिक वर्षी नव्या माध्यम धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. (खास प्रतिनिधी)