शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

वास्को व परिसरात महिन्याला १०० हून अधिक नागरिकांचा कुत्रे घेतात चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 19:43 IST

मुरगाव तालुक्याच्या रुग्णांसाठी सेवा देण्याकरीता उपलब्ध असलेल्या चिखली उपजिल्हा इस्पितळात दर महिन्याला कमीत कमी १०० रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारसाठी येत असल्याची माहीती सामोरे आली

 - पंकज शेट्ये वास्को - मुरगाव तालुक्याच्या रुग्णांसाठी सेवा देण्याकरीता उपलब्ध असलेल्या चिखली उपजिल्हा इस्पितळात दर महिन्याला कमीत कमी १०० रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारसाठी येत असल्याची माहीती सामोरे आली असून यापैंकी बहुतेकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतलेला असतो. गोव्यातील इतर तालुक्याबरोबरच मुरगाव तालुक्यात सुद्धा विविध भागात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री वाढल्याने याचा नागरीकांना विविध प्रकारे त्रास सोसावा लागतो. मागच्या दिड महीन्यात दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर दोन वेळा भटकी कुत्री फिरकल्याने दोन विमानांना सुद्धा धोक्याच्या सामोरे जावे लागले असून मुरगाव तालुक्यात वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणावर आळा आणण्यासाठी कडक पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.मुरगाव तालुक्यात वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी व मुरगाव असे चार मतदारसंघ येत असून ह्या चारही मतदारसंघात असलेल्या विविध भागात मागच्या काही काळात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणामुळे नागरीकांना याचा विविध प्रकारे त्रास सोसावा लागतो. मुरगाव नगरपालिकेच्या सडा भागातील कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या बाहेरील परिसरात तर मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री वाढलेली असून यामुळे ह्या भागातून प्रवास करणाऱ्या नागरीकांना त्यांचा धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीने अथवा चालत जाणा-या नागरिकांचा सदर भागातील कुत्रे मोठ्या प्रमाणात पाठलाग करत असून स्वताचा जीव वाचवण्यासाठी नागरीकांना त्यांच्या दुचाकीचे अथवा चालण्याचे वेग वाढवावे लागते.सडा कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या बाहेरील परिसराती भटक्या कुत्र्यांनी मागच्या काही वर्षापूर्वी एक दोन वेळा छोट्या मुलांवर हल्ला केल्याने ह्या मुलांना गंभीर जखमी होण्याची पाळी निर्माण झाली होती. भटक्या कुत्र्यांनी दाबोळी विमानतळावरील विमान वाहतूक सेवेला सुद्धा मागच्या काळात हैराण केलेले असल्याचे दिसून आले असून विमानातून प्रवास करणाºया नागरीकांच्या तसेच विमान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत हा प्रकार धोकादायक सुद्धा ठरू शकतो. दरम्यान दाबोळी विमानतळ परिसरात भटकणा-या कुत्र्यांना दुस-या स्थळावर स्थलांन्तरीत करण्याचे काम एका संस्थेला देण्यात आलेले आहे. एका महीन्याच्या काळात सुमारे ८३ भटक्या कुत्र्यांना दुस-या ठिकाणी हलवण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. वाढणाºया भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणावर आळा आणण्यासाठी विविध संबंधीत संस्था कुत्र्यांचे निर्भीजीकरण तसेच अन्य विविध पावले उचलत असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे, मात्र हे उपाय पुरेसे आहेत की त्यात वाढ करण्याची गरज आहे असा सवाल भटक्या कुत्र्यांच्या संख्येत होणारी वाढ पाहून पडतो.चिखली उपजिल्हा इस्पितळात प्रत्येक महीन्याला कमीत कमी १०० नागरीक कुत्र्याने चावा घेतल्याने उपचार घेण्यासाठी येत असल्याची माहीती डॉ. राजेंद्र बोरकर यांनी देऊन यापैंकी बहुतेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला असतो अशी माहीती दिली. कुत्र्यांने चावा घेतलेल्या रुग्णावर उपचार करण्याच्या औषधाचा पुरेसा साठा चिखली उपजिल्हा इस्पितळात उपलब्ध असतो असे बोरकर यांनी माहीतीत सांगितले.मुरगाव नगरपालिकेने त्यांच्या हद्दीत असलेल्या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम ‘पिपल्स फोर अ‍ॅनिमल’ ह्या संस्थेला दिलेले असल्याची माहीती मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी दिली. पालिकेने त्यांच्याशी याबाबत करार केलेला असून प्रत्येक भटक्या कुत्र्याच्या निर्बिजीकरणा मागे मुरगाव नगरपालिका त्या संस्थेला ९७५ रुपये देते. मे २०१७ ते ऑक्टोंबर २०१८ ह्या काळात मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीतील ८१६ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते तर नोव्हेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ ह्या काळात ३२९ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याची माहीती शंखवाळकर यांनी पुढे दिली. पालिका हद्दीत वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणावर आळा आणण्यासाठी येणाºया काळात आणखीन अचुक पावले उचलण्यात येणार असे त्यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :dogकुत्राgoaगोवा