शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कितीही विरोध झाला तरी गोव्यात श्रीराम सेना स्थापणारच : मुतालिक

By admin | Updated: June 26, 2014 01:25 IST

फोंडा : श्रीराम सेनेचा एकही विभाग गोव्यात अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, तत्पूर्वीच श्रीराम सेनेच्या बाबतीत दहशत पसरवली जात आहे.

फोंडा : श्रीराम सेनेचा एकही विभाग गोव्यात अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, तत्पूर्वीच श्रीराम सेनेच्या बाबतीत दहशत पसरवली जात आहे. ही एक देशप्रेमी संघटना आहे. तिचे कार्य गोव्यात सुरू झाल्यास काँग्रेस तसेच विद्यमान भाजप सरकारची लाचखोरी, भ्रष्टाचार यांसारख्या कृत्यांत गुंतलेल्यांच्या भानगडी उघड होण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे काही राजकीय नेते व ख्रिश्चन समुदाय श्रीराम सेनेला घाबरत आहे. मात्र, कोणी कितीही विरोध केला तरी येत्या सप्टेंबरपर्यंत गोव्यात सेनेची शाखा सुरू करणार असल्याचा निर्धार श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी रामनाथी बांदोडा येथे बुधवारी व्यक्त केला. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने ते आले होते. विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमची ताकद लावा, आम्ही आमची ताकद लावू, असे उघड आव्हानही मुतालिक यांनी दिले. ते म्हणाले, सात वर्षांपासून श्रीराम सेना देशातील विविध भागांत कायद्याच्या चौकटीत काम करत आहे. तसेच गोव्यातही करेल. गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या संघटनेवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. याबद्दल मुतालिक म्हणाले, पर्रीकरांना आपल्याबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत आपण त्यांची भेट घेऊन बाजू मांडणार आहे. भाजपात प्रवेश करताच पक्षातून हकालपट्टी झाली, याबद्दल ते म्हणाले, आपण स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे. त्यासाठीच आपले पाय ओढण्याचा प्रयत्न होत आहेत. मागील गोवा भेटीवेळी मुतालिक यांनी प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवावी, असे आवाहन केले होते. याबाबत ते म्हणाले, शस्त्रपूजा ही हिंदूंची संस्कृती आहे. हिंदूंच्या प्रत्येक देवाच्या हातांत शस्त्र आहे. हिंदूंच्या घरात तलवारी ठेवाव्यात ते कोणा मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मीयांस मारण्यासाठी नव्हे, तर हिंदू समाज व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी. पुढील काळात रस्तो-रस्ती दंगे, जाळपोळ होणार, हे निश्चित आहे. त्या काळात स्वसंरक्षणासाठी हिंदूंनी घरात तलवारी ठेवाव्यात. या वेळी सेनेचे कर्नाटकातील कार्यकारी सचिव गंगाधर कुलकर्णी, तामिळनाडू येथील सेनेचे सरचिटणीस अर्जुन संपथ, तसेच हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)