शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळातून एका सराईत गुन्हेगाराचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 13:45 IST

रात्री प्रकृती बिघडल्याचे त्याला बाळळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथून त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिले. त्याच्यासोबत दोन पोलीस शिपाईही तैनात केले होते. ​​​​​​​

मडगाव: गोव्यातील मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळातून एका सराईत गुन्हेगाराने पोलिसांना चकवा देऊन धूम ठोकली. काल बुधवारी रात्री ही घटना घडली. गॅबी फर्नांडिस (२५) असे या संशयिताचे नाव असून, चोरीप्रकरणी त्याला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली होती. रात्री प्रकृती बिघडल्याचे त्याला बाळळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथून त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिले. त्याच्यासोबत दोन पोलीस शिपाईही तैनात केले होते.हॉस्पिसियोच्या पुरुष शस्त्रक्रिया वॉर्डमध्ये त्याला दाखल केले असता, त्याने पोलीस शिपाई सर्वेश नाईक याला मारहाण करून पळ काढला. नंतर यासंबधी फातोर्डा पोलीस ठाण्यात नाईक यांनी रितसर तक्रार नोंद केली. भारतीय दंड संहितेच्या ३५३ व २२४ कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक पुढील तपास करीत आहेत.दरम्यान गॅबी याला इस्पितळात दाखल करताना त्याच्यासोबत ड्युटीसाठी जे दोन पोलीस शिपाई होते, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होउ शकते. २0१८ साली कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात घडलेल्या एका वाहन चोरी प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती. चोरी प्रकरणात त्याला कुडचडे येथील पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले होते.