शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: गौतम खट्टरचा जामिनासाठी अर्ज; निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:15 IST

या प्रकरणातील गंभीर आरोप पाहता न्यायालय आता या अर्जावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित गौतम खट्टर याने बुधवारी वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणातील गंभीर आरोप पाहता न्यायालय आता या अर्जावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वास्को येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान गौतम खट्टरने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि अपमानजनक वक्तव्य केले होते. या विधानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध ख्रिस्ती संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांनी या विधानाचा निषेध करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. खट्टरच्या अटकेसाठी आंदोलने करण्यात आली. राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत अनेक पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला होता. क्राईम ब्रँचने तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारे शोधमोहीम राबवून गौतम खट्टरला अटक केली होती. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावणे आणि समाजात तेढ निर्माण करणे यांसारख्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माधव खट्टरची सुटका

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेला माधव खट्टर याची अखेर कोलवाळ कारागृहातून सुटका झाली आहे. वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने खट्टरला १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा एक जामीनदार सादर करण्याचे निर्देश दिले होते. या अटींची पूर्तता केल्यानंतर बुधवारी त्याची कारागृहातून मुक्तता करण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gautam Khattar Seeks Bail in Controversial Statement Case; Decision Awaited

Web Summary : Gautam Khattar, arrested for offensive remarks against St. Francis Xavier, has applied for bail. Previously, Madhav Khattar was released on conditional bail in the same case after widespread condemnation and police investigation into the matter.
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी