शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘क्यार’ चक्रीवादळामुळे समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांची सुटका करून तटरक्षक दलाचे जहाज किनाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 23:28 IST

‘क्यार’ चक्रीवादळाच्या काळात खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मासेमारी ट्रोलरवरील ९ कामगारांचा जीव धोक्यात असल्याचे तटरक्षक दलाला जाणवताच त्यांना सुखरूप बचाविल्यानंतर सोमवारी (दि.२८) मुरगाव बंदरात घेऊन दाखल झाले.

वास्को - ‘क्यार’ चक्रीवादळाच्या काळात खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मासेमारी ट्रोलरवरील ९ कामगारांचा जीव धोक्यात असल्याचे तटरक्षक दलाला जाणवताच त्यांना सुखरूप बचाविल्यानंतर सोमवारी (दि.२८) मुरगाव बंदरात घेऊन दाखल झाले. ‘क्यार’ चक्रीवादळाच्या काळात खोल समुद्रात मासेमारी बांधवांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलाच्या गोवा विभागाच्या ‘आयसीजीएस सम्राट’ जहाजाला तैनात करण्यात आले असून २६ व २७ आॅक्टोंबर अशा दोन दिवसात त्यांच्याकडून ९ मासेमारी कामगारांना बचावण्यात आल्याची माहीती दलाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.‘क्यार’ चक्रीवादळाचा दणका मागच्या दोन दिवसात गोव्यालाही विविध माध्यमाने बसला असून यामुळे गोव्यातील अनेक वृक्षे कोसळणे अशा विविध घटना घडल्या होत्या. ह्या चक्रीवादळामुळे खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी ट्रोलर्स अथवा नौका घेऊन गेलेल्या मासेमाऱ्यांना धोक्यातून सुखरूप रित्या बचावून आणण्यासाठी तटरक्षक दलाच्या ‘आयसीजीएस सम्राट’ ह्या जहाजाला गेले काही दिवस खोल समुद्रात तैनात करण्यात आले होते. २६ व २७ आॅक्टोंबर असे दोन दिवस ‘क्यार’ चक्रीवादळामुळे समुद्रातील वातावरण एकदम खराब झाले होते. खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या ‘स्वर्ण ज्योती’ व ‘गंगा गणेश’ नावाच्या दोन भारतीय मासेमारी ट्रलर्सवरील मासेमारी कामगारांचा जीव धोक्यात आल्याचे तैनात करण्यात आलेल्या तटरक्षक दलाच्या जहाजावरील जवानांना दिसून आले. त्यांनी यावेळी कुठल्याच गोष्टीचा विचार न करता ‘क्यार’ चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्राच्या ल्हाटांना तसेच वादळी वा-याला सामोरे जात जवान जहाजासहीत सदर मासेमारी ट्रोलर्ससमोर पोचले. ह्या ट्रोलर्सवर एकूण ९ कामगार असून त्यांचा जीव धोक्यात असल्याचे समजताच नंतर त्यांना त्या मासेमारी ट्रोलर्सवरून तटरक्षक दलाच्या ‘सम्राट’ जहाजावर सुखरूप रित्या घेऊन त्यांचा जीव बचावण्यात आला.२६ व २७ अशा दोन दिवसात दोन मासेमारी ट्रोलर्सवरील ९ कामगारांना सुखरूप रित्या बचाविल्यानंतर तसेच ‘क्यार’ चक्रीवादळाचा येथे निर्माण झालेला धोका दूर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी (दि.२८) दुपारी १.३० वाजता तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस सम्राट’ जहाज त्यांना घेऊन गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले. देशाच्या किनारपट्याच्या सुरक्षेबरोबरच खोल समुद्रात जीव धोक्यात असलेल्यांना बचावण्याचे तटरक्षक दलाचे असलेले ध्येय त्यांनी ‘क्यार’ चक्रीवादळामुळे धोक्यात असलेल्या ९ कामगारांचा जीव बचावून पुन्हा एकदा पूर्ण केले.

टॅग्स :goaगोवा