शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

फेलिक्स दहाल मृत्यू प्रकरणाचा सीबीआयकडून पुन्हा तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 16:47 IST

एम्सच्या डॉक्टराकडून घटनास्थळाची पहाणी: अपघात की खून याबददल शाशंकता

मडगाव: पाच वर्षापूर्वी गोव्यात आला असताना संशयास्पदरित्या मरण पावलेल्या फिनीश तरुण फेलिक्स दहाल (२२) याच्या मृत्यूच्या प्रकरणाची बंद झालेली फाईल सीबीआयने पुन्हा खुली केली आहे. या तरुणाचा मृत्यू कसा झाला असावा याचा अंदाज घेण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने बुधवारी घटनास्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली.२८ जानेवारी २0१५ रोजी काणकोण येथे फिनीश तरुणाचा मृत्यू आला होता. मद्यधुंद अवस्थेत असताना रस्त्यावर कोसळल्याने त्याचा मृत्यू आला असावा असा प्राथमिक संशय स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती. पण फेलिक्सची आई मीना फिरहॉनन यांनी न्यायालयात हे प्रकरण लावून धरल्यानंतर खून म्हणून हे प्रकरण नोंद करुन पुन्हा तपास करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र तसा तपास करुनही पोलिसांच्या हाती कसलाच पुरावा न लागल्याने या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. पण फेलिक्सच्या आईच्या मागणीवरुन या प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला.हा मृत्यू कसा झाला असावा याचा तपास करण्यासाठी सीबीआयने एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला मागितला असून त्यानुसार एम्सच्या न्यायवैद्यक विभागातील तीन डॉक्टरांच्या पथकाने ज्या ठिकाणी फेलिक्सचा मृत्यू झाला होता, त्या भागाची पाहणी केली. येत्या दोन महिन्यात हे पथक आपला अहवाल देणार आहे.या प्रकरणात मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात शवविच्छेदन झाले होते. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयच्या विनंतीवरुन दिल्लीतील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील तज्ञांनी मागच्या वर्षी घटनास्थळाला भेट देऊन हा मृत्यू कसा झाला असावा याची प्रात्यक्षिकाद्वारे पाहणी केली होती. हा मृत्यू अपघाती की खून या संदर्भात ही संस्था आपला अहवाल देणार असून या अहवालाची आम्ही वाट पहातो असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.सीबीआयच्या चौकशीप्रमाणे मृत्यूपूर्वी फेलिक्सला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला. फेलिक्सच्या आईनेही पैशाच्या वादातून दोघा तरुणांकडून आपल्या मुलाला मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असा आरोप केला होता.