शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कॅटरिंग व्यवसायाला गॅस तुडवड्याचा फटका; किमान ५० टक्के व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 08:00 IST

आम्हाला या संबंधी तोडगा काढण्याचे आश्वसन दिले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: लग्न सराईच्या दिवसांना नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. संपूर्ण वर्षभरातील आगामी चार महिने हे आमच्या व्यवसायासाठी लाभदायक असतात. परंतु नेमके या मोक्याच्या क्षणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने कॅटरिंग व्यावसायिकांसमोर संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याकडे तातडीने लक्ष देत सरासरी गरजेपेक्षा किमान ५० टक्के पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी अखिल गोवा कॅटरर्स संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेसाठी संघटनेचे अध्यक्ष सुदेश भिंगी यांच्यासह संघटना सचिव महंमद शेख, खजिनदार रोहित नाईक, सदस्य दीपा शिरगावकर, अभिजीत तेली, विघ्नेश गावकर, प्रदोश आमोणकर, गिरीश देसाई, वैभव काणेकर हे पदाधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भात माहिती देताना भिंगी म्हणाले की, युद्धाचे जे सावट निर्माण झाले आहे त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, याची जाण आमच्या संघटनेला आहे. आज घरगुती सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. त्याच धर्तीवर आम्हाला किमान सिलेंडर मिळतील याची तजवीज ते २ करतील अशी आशा आहे.आमच्या संघटनेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आठ दिवसापूर्वी आम्ही ही मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला या संबंधी तोडगा काढण्याचे आश्वसन दिले होते. 

चुलीवरील जेवण देण्यातही अडचणी

भिंगी म्हणाले, आम्ही लग्नाच्या ऑर्डर्स अगोदरच घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यानुसार गुंतवणूकही केलेली आहे. मात्र अचानक तुटवडा भासत असल्याने ग्राहकांना काय स्पष्टीकरण द्यावे असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे. आमच्या ग्राहकांकडून आम्ही आगाऊ रक्कमही स्वीकारलेली आहे. पूर्वीचे स्वयंपाकी हे चुलीवर जेवण करण्यात पारंगत होते. आताच्या स्वयंपाक्यांची चुलीवर स्वयंपाक करताना त्यांची तारांबळ उडते. त्यामुळे चुलीवरचे जेवणही आम्ही आज देऊ शकत नाही.

सावरत असतानाच पुन्हा धक्का

अडचण लक्षात घेऊन आम्ही काही पदार्थामध्ये कपात करणार. मात्र सरसकट पदार्थ टाळणे अशक्य आहे. आमचे कामगारही आमच्यावरच अवलंबून आहेत. आज व्यवसाय खोळंबल्यास त्यांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. परत एकदा गावी गेलेला कामगार पुन्हा येताना दिवस काढतो. तो एक वेगळा फटका केटरर्सना बसू शकतो. कोरोनाच्या महामारीतून आमचा व्यवसाय नुकताच कुठे पूर्वपथावर आलेला आहे. त्यात पुन्हा एकदा हे संकट आमच्या समोर उभे झाले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Shortage Hits Catering Business; Demand for 50% Supply Restoration

Web Summary : Catering businesses in Goa face a crisis due to a commercial gas cylinder shortage during the peak wedding season. The All Goa Caterers Association is urging Chief Minister Pramod Sawant to restore at least 50% of the gas supply to avert potential order cancellations and job losses, impacting livelihoods and business recovery.
टॅग्स :goaगोवाLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईCylinderगॅस सिलेंडर