नव्या कॅसिनोला दिलेली मंजुरी रद्द करा; 'पणजीकर अगेंस्ट कॅसिनो' संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 07:45 IST2026-04-22T07:43:23+5:302026-04-22T07:45:11+5:30

कॅसिनो जहाजाला देण्यात आलेल्या मंजुरीत अनियमितता झाल्याचा आरोप

cancel the approval given to the new casino demand of the organization panjikar against casino | नव्या कॅसिनोला दिलेली मंजुरी रद्द करा; 'पणजीकर अगेंस्ट कॅसिनो' संघटनेची मागणी

नव्या कॅसिनोला दिलेली मंजुरी रद्द करा; 'पणजीकर अगेंस्ट कॅसिनो' संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क,  पणजी : 'पणजीकर अगेंस्ट कॅसिनो' या संघटनेने मांडवी नदीत कार्यरत असलेल्या डेल्टा प्लेझर क्रुझेसच्या ११२ मीटर लांबीच्या कॅसिनो जहाजाला देण्यात आलेल्या मंजुरीत अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. सोमवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, आपचे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक, पेट्रिशिया पिंटो, सबिना मार्टिन्स व इतर सदस्य उपस्थित होते.

वाल्मिकी नायक म्हणाले, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि नियमांची योग्य पूर्तता केली नसून संबंधित प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे. तसेच, पर्यावरणीय नियमांचे पालन झाले का? याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी बंदर कप्तानची परवानगी न घेता या कॅसिनोला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली असून, मांडवी नदी परिसरातील पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रिशिया पिंटो म्हणाल्या, मांडवीत नव्या कॅसिनोला मंजुरी देण्याचे काम हे बंदर कप्तानचे आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने मंजुरी देणे योग्य नाही. या मोठ्या कॅसिनोमुळे मांडवी नदीतील प्रदूषणात आणखी वाढ होणार आहे. हा मोठा कॅसिनो असल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येत आहे.
 

Web Title : नये कैसीनो की मंजूरी रद्द करें: 'पणजीकर अगेंस्ट कैसीनो' की मांग।

Web Summary : 'पणजीकर अगेंस्ट कैसीनो' ने अनियमितताओं और पारदर्शिता की कमी का आरोप लगाते हुए कैसीनो की मंजूरी रद्द करने की मांग की। उन्होंने पर्यावरणीय अनुपालन पर चिंता जताई और मुख्यमंत्री की अनुमोदन प्रक्रिया पर सवाल उठाया, प्रदूषण और सुरक्षा चिंताओं के कारण जांच और स्थानीय हितों को प्राथमिकता देने का आग्रह किया।

Web Title : Cancel new casino approval: Panajikars Against Casino demands inquiry.

Web Summary : 'Panajikars Against Casino' demands cancellation of the casino approval, alleging irregularities and lack of transparency. They raised concerns about environmental compliance and questioned the Chief Minister's approval process, urging investigation and prioritizing local interests due to pollution & safety concerns.