मंत्रिमंडळाची आज बैठक; माहिती आयुक्त ठरणार

By Admin | Updated: May 28, 2014 01:57 IST2014-05-28T01:55:43+5:302014-05-28T01:57:42+5:30

मंत्रिमंडळाची आज बैठक; माहिती आयुक्त ठरणार

Cabinet meeting today Become the information commissioner | मंत्रिमंडळाची आज बैठक; माहिती आयुक्त ठरणार

मंत्रिमंडळाची आज बैठक; माहिती आयुक्त ठरणार

पणजी : राज्यासाठी माहिती आयुक्तांच्या दोन जागा भरण्यासाठी उमेदवारांची निवड झाली असून त्या निवडीस उद्या बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांच्या खंडानंतर बुधवारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत काही खात्यांतील नोकरभरतीबाबतचे तसेच काही खात्यांतील अधिकार्‍यांना निवृत्तीनंतर सेवावाढ देण्याबाबतचे प्रस्ताव चर्चेस येणार आहेत. अन्य एक-दोन छोट्या योजनांबाबतचे प्रस्तावही मंत्रिमंडळासमोर निर्णयासाठी ठेवले जाणार आहेत. राज्यासाठी दोन राज्य माहिती आयुक्तांची निवड करण्याबाबतच्या प्रस्तावांवर यापूर्वी संबंधित समितीने निर्णय घेतला आहे. बुधवारी प्रथमच हा विषय मंत्रिमंडळासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीत निवडीला मान्यता मिळाल्यानंतर ती निवड जाहीर केली जाईल. गेले अनेक महिने राज्य माहिती आयुक्तपदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मुख्य माहिती आयुक्तपद भरण्यात आले आहे. यापूर्वी सरकारने राज्य माहिती आयुक्तांचे एकच पद भरण्याबाबतची प्रक्रिया बरीच पुढे नेली होती. नंतर त्या प्रक्रियेस आक्षेप घेतला गेल्यानंतर प्रक्रिया सदोष असल्याचे सरकारने मान्य करून ती रद्द केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारने राज्य माहिती आयुक्त निवडीबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांचा समावेश असलेल्या एका समितीने राज्य माहिती आयुक्तांच्या पदांसाठी उमेदवारांची नावे यापूर्वी तत्त्वत: मान्य केली आहेत. (खास प्रतिनिधी)

Web Title: Cabinet meeting today Become the information commissioner