पणजी : राज्यात कोणत्याही अडथळ्यांविना विविध उद्योग, हॉटेल्स व अन्य प्रकल्प उभे राहावेत व राज्याची अर्थव्यवस्था-औद्योगिक प्रगती वाढीस लागावी, या हेतूने राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी गुंतवणूक धोरणास मंजुरी दिली. नव्या उद्योगांसाठी विविध प्रकारच्या कर आणि अन्य सवलती या धोरणाद्वारे जाहीर झाल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. गुंतवणूक धोरण हे उद्योग धोरण नव्हे; कारण उद्योग क्षेत्रासह पर्यटन, माहिती तंत्रज्ञान व गरजेनुसार आरोग्य, अशा क्षेत्रांतील प्रकल्पही धोरणाच्या कक्षेत आणण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}