शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंती निमित्त गोव्यात विविध कार्यक्रमांचे भाजप आयोजन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:50 IST

Gandhi Jayanti 2019 : गोव्यात महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे गोव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

पणजी : गोव्यात महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे गोव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गोव्यात भाजपने राज्यस्तरावर व सर्व मतदारसंघात गांधी जयंती बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांची 150 जयंती साजरी करताना एकूण तीन महिने कार्यक्रम राबविण्याचे ठरल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात भाजपाचे मंत्री, आमदार व प्रमुख कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहे.

भाजपने आपल्या सर्व आमदारांना या कार्यक्रमाची कल्पना दिली असून भाजपचे मंत्री, आमदारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी रात्री पणजीत पार पडली. त्यावेळी कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या (बुधवारी) भाजपचे मंत्री, आमदार गांधी जयंती साजरी करतील. त्याचप्रमाणे दोन किलोमीटर पदयात्रा काढून गांधींविषयी जागृतीही करण्यात येणार आहे. यावेळी प्लास्टीक बंदीबाबतही नागरिकांमध्ये जागृती केली जाईल.

गोव्यातील शासकीय सोहळे, शासकीय बैठका अशा ठिकाणी प्लॅस्टीकच्या पाण्याच्या बाटल्यासोबतच प्लॅस्टीकचे ग्लास किंवा बश्या वापरायच्या नाहीत असा लेखी आदेश गोवा सरकारने दोन दिवसांपूर्वीच जारी केला आहे. पणजीतील मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या जहाजांमध्ये कॅसिनो जुगार चालतो. महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने हा जुगार उद्या दिवसभर बंद ठेवला जाणार आहे. सरकारच्या गृह खात्याने तशी सूचना सर्व कॅसिनो व्यवसायिकांना करावी असे ठरविले आहे. अगोदरच कॅसिनो जुगारावरून भाजप सरकारवर विरोधी पक्ष व लोक टीका करत आहेत. तशाच गांधी जयंती दिनी तरी कॅसिनो जुगार सुरू ठेवायचा नाही हे सरकारचे धोरण आहे. गोवा सरकार जुनेगोवे येथे असलेल्या गांधीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गांधी जयंती साजरी करणार आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपाgoaगोवा