शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'सावकारी' धोरण राबविणाऱ्या भाजपला कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत- गिरीश चोडणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 19:35 IST

नवीन कायद्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

मडगाव: भाजप पक्ष श्रीमंतांचा उदोउदो करण्याचे धोरण राबवुन देशात "सावकारी" राजवट  आणण्यात व्यस्त असुन, त्यामुळेच भाजप सरकारला गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत. भाजपच्या ह्या धनाड्यांच्या  प्रेमामुळेच भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना राजभवनावरील  काँग्रेसच्या भव्य मोर्चात सामील झालेले शेकडो कष्टकरी  "शेतकरी" दिसले नव्हते अशी टिका  गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रिवण येथे किसान काँग्रेस तर्फे आयोजीत किसान मेळाव्यात बोलताना केली. या मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजपला जर शेतकऱ्यांचा खराच पुळका असता तर गोव्यातील ऊस, काजू, सुपारी, नारळ तसेच भातशेती करणाऱ्या गोमंतकीय शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या  ऐकुन घेण्यासाठी मागच्या आठवड्यात गोव्यात भाजपची  जाहिरतबाजी करण्यास आलेले  केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर का भेटले नाहीत असा प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी यावेळी विचारुन, भाजपने आणलेल्या नव्या कायद्याने विवीध पिकांसाठी मिळणारी  सरकारी आधारभुत किम्मत यापुढे बंद करुन शेतकऱ्यांना मोठ्या उद्योगपती व व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान  भाजप सरकारने आखल्याचा दावा केला. या नवीन कायद्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

क्रोनी कॅपिटालीस्टांचे हित जपणाऱ्या भाजपला देशातला गरीब दिसत नसुन, या असंवेदनशील भाजपच्या कानावर सामान्यांच्या समस्या पडत नाहीत असा टोला खासदार फ्रांसीस सार्दिन यांनी यावेळी बोलताना हाणला.  नवा कृषी कायदा आणल्याने "दलाली" बंद होणार असे सांगणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना  सदर कायद्यामुळे राज्य सरकारला ९ कोटी नुकसान होणार असे स्पष्ट सांगणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे " दलाल" वाटतात का हे त्यांनी  स्पष्ट करावे अशी मागणी काँग्रेस किसान मोर्चाचे निमंत्रक अभिजीत देसाई यांनी केली. 

यावेळीस्थानीक शेतकरी बोसत्यांव सिमोईस , सांगे गट काँग्रेस अध्यक्षा जोसफीना रोड्रीगीस ,विकेएसएस सोसायटीचे अध्यक्ष व माजी सरपंच जुझे आफोंसो यानी भाजप सरकारच्या किसान विरोधी कायद्यावर टिका केली. काँग्रेसचे प्रदेश सचिव रजनीकांत नाईक यांनी स्वागत केले तर सांगे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भगत यांनी आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी