शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाओ’साठी उत्तर गोव्याची निवड

By admin | Updated: October 8, 2014 01:27 IST

पणजी : राज्यात २0१३ साली एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२६ असल्याच्या अहवालानंतर उत्तर गोवा जिल्ह्याची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासाठी निवड झाली आहे.

पणजी : राज्यात २0१३ साली एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२६ असल्याच्या अहवालानंतर उत्तर गोवा जिल्ह्याची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासाठी निवड झाली आहे. या अभियानाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बाल कल्याण खात्याला केंद्राकडून दीड कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. स्त्री भू्रणहत्या थांबावी, तसेच मुलींना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देशातील १00 जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने १00 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत सर्वेक्षण आणि जागृती कार्य करणाऱ्या प्रतिनिधींनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, एक हजार मुलांमागे मुलींची संख्या सर्वांत कमी दमण येथे आढळली, तर गुजरात येथे ७00, दिल्ली येथे ८५६, अशी दिसून आली. उत्तर गोव्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२६ आढळली. यंदा २0१४ साली त्यात वाढ होऊन ती ९३९ झाल्याचे महिला व बाल कल्याण खात्यातील सूत्रांनी सांगितले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत काही राज्यांत आजही स्त्री भ्रूणहत्येचे विदारक चित्र पाहायला मिळते. यात भारताची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. बिहार, झारखंड येथेही बऱ्याच प्रमाणात स्त्री भ्रूणहत्या होत असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. काही राज्यांतील अनाथाश्रमात मुलांची संख्या मोठी आहे. यात मुलींचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळते. महाराष्ट्रातील काही भागांचा यात समावेश आहे. सर्वेक्षणांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, काही पालक मुलीच्या जन्मानंतर तिला अनाथाश्रमात सोडतात. बिहार, झारखंड येथील भागात तर मुली हरवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. बऱ्याच वेळा पालकच मुलींना मुद्दाम सोडून देतात. ‘ट्रॅक चाईल्ड डॉट कॉम’ या बेवसाईटवर अशा सापडलेल्या अनेक मुलांविषयी माहिती आहे. राज्यात सध्या दोन मुले बेपत्ता आहेत, तर विविध बाल संगोपन केंद्रांत सुमारे १५00 मुले आहेत. राज्यात एकूण ६१ बाल संगोपन केंद्रे असून यातील ४६ केंद्रे महिला व बाल कल्याण खात्यांतर्गत नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्र राज्यातील ३५७९ मुले बेपत्ता आहेत. तेथील बाल संगोपन केंद्रांत साधारण १६ हजार ९९१ मुले आहेत. (प्रतिनिधी)