शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनात आणखी ३५३ जणांचा सहभाग

By admin | Updated: February 17, 2015 02:25 IST

पणजी : गेले दहा दिवस पणजीत आंदोलनासाठी बसलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष

पणजी : गेले दहा दिवस पणजीत आंदोलनासाठी बसलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आता सुरक्षा रक्षकांतर्फे येत्या गुरुवारपासून प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा घेण्यात येतील. सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाला आता क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. कामगारांना यापूर्वीच सेवेतून कमी केले आहे. कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही सह्यांच्या मोहिमेद्वारे जनतेचे सहकार्य घेण्यासाठी पुढे येणार. तसेच राज्यातील विविध मतदारसंघांत जाहीर सभा घेऊन कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत जागृती करणार असल्याचे सुरक्षा रक्षकांचे नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले. ज्येष्ठ कॉम्रेड नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सुरक्षा रक्षक ट्रेड युनियनतर्फे सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी आंदोलनाची पुढील रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. पणजीत आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाला तीव्र स्वरूप आणता येत नव्हते. मात्र, आता आम्ही विविध शहरांत जाऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न जनतेसमोर मांडणार असल्याचे राणे यांनी सांगितले. पाच खात्यांतील कर्मचारी नोकरीत कायम करावे म्हणून आंदोलनासाठी बसले होते. त्यात आज क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा प्राधिकरणाचे १४५ तर क्रीडा खात्याचे २0८ कर्मचारी सुरक्षा रक्षकांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावरील आंदोलनात आज सोमवारपासून सहभागी झाले आहेत, असे राणे यांनी सांगितले. आंदोलनात सहभागी झालेले नागरिक विविध भागातील आहेत. त्यामुळे स्थानिक आमदारांनाही कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात येईल. आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणी करून सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली जाईल, असे सुरक्षा रक्षकांच्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)