शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

७२ खाणींच्या ‘ईसीं'चे निलंबन मागे

By admin | Updated: March 18, 2015 01:05 IST

गोव्यातील खनिज खाणींचे २0१२ साली पर्यावरणविषयक दाखले (ईसी) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने निलंबित केले होते. त्या एकूण

सद्गुरू पाटील ल्ल नवी दिल्ली गोव्यातील खनिज खाणींचे २0१२ साली पर्यावरणविषयक दाखले (ईसी) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने निलंबित केले होते. त्या एकूण खाणींपैकी ७२ खाणींचे पर्यावरणविषयक दाखल्यांवरील निलंबन मागे घेत असल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत गोव्यातील पत्रकारांशी बोलताना केली. अभयारण्यांच्या बफर झोनमधील २२ खनिज खाणींच्या पर्यावरण दाखल्यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालय ठरवेल, असे जावडेकर यांनी सांगितले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत बोलताना जावडेकर म्हणाले की, ७२ खाणी वगळता १८ खाणींना वन खात्याचे दोन प्रकारचे वनविषयक दाखले घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांचे पर्यावरण दाखले अजून निलंबित आहेत. ७२ खाणींच्या पर्यावरण दाखल्यांवरील निलंबन उठविताना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या गोव्याबाबतच्या निवाड्याचे पूर्ण पालन करण्यात आले आहे. जावडेकर म्हणाले की, एम.बी. शहा यांच्या चौकशी आयोगाने दिलेल्या अहवालानंतर २0१२ साली त्यावेळच्या केंद्र सरकारने एकतर्फी पद्धतीने पर्यावरण दाखले निलंबित केले होते. त्यामुळे देशाचे नुकसान झाले. दरम्यान, निलंबन मागे घेण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला, तरी प्रत्यक्ष खनिज खाणी सुरू होण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जल आणि हवा प्रदूषणविषयक मान्यता खाण उद्योगांना घ्यावी लागेल. ते काम आता खनिज व्यावसायिकांनी करावे. आम्ही आमचे काम पूर्ण केले आहे. निलंबन मागे घेत असल्याचा लेखी आदेश आता तत्काळ निघेल, असे जावडेकर यांनी सांगितले. गोवा सरकारने एकूण ८९ खनिज लिजांचे नूतनीकरण केले आहे. त्यापैकीच ७२ खाणींच्या परवान्यांचे निलंबन मागे घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाने वार्षिक या खाणींना २0 दशलक्ष टन इतकी उत्पादन मर्यादा ठरवून दिली आहे. त्याचे पालन व्हावे म्हणून प्रत्येक खाणीच्या उत्पादन प्रमाणावर लक्ष ठेवून देखरेख करावी, अशी सूचना आम्ही गोवा सरकारला केली आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. खाणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा/२