शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार नागरिक एकत्र करणार विक्रमी योग!

By admin | Updated: June 21, 2015 02:33 IST

पस्तीस हजार भारतीयांनी एकाच ठिकाणी एकत्र येऊन योगा करणे हा जगातील पहिला प्रयोग आहे, असे केंद्रीय आयुष खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी सांगितले.

सद्गुरू पाटील ल्ल पणजीपस्तीस हजार भारतीयांनी एकाच ठिकाणी एकत्र येऊन योगा करणे हा जगातील पहिला प्रयोग आहे, असे केंद्रीय आयुष खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी सांगितले.दिल्लीहून दूरध्वनीवरून खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी श्रीपाद नाईक म्हणाले, की दिल्लीत राजपथावर आम्ही ३५ हजार लोकांची योग कार्यक्रमासाठी व्यवस्था केली आहे. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आता इच्छुकांची गर्दी वाढली आहे. ऐनवेळी आम्ही आणखी व्यवस्था करू शकत नाही. तरीही बरीच तयारी केली असून एक वेगळाच माहोल दिल्लीत व देशभर निर्माण झाला आहे. ३५ हजारांवरून ३८ हजारांपर्यंत संख्या जाईल, असे वाटले होते. प्रत्यक्षात आता ४० हजार लोक राजपथावरील योग कार्यक्रमात सहभागी होऊ पाहात आहेत.नाईक म्हणाले की, योगाचे महत्त्व लोकांना पटले आहे. प्रत्येकाच्या आरोग्याच्या हितासाठी योग महत्त्वाचा आहे. राजपथावरील कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती असेल. योगगुरू रामदेवबाबा हेही उपस्थित असतील. श्रीपाद नाईक म्हणाले, की गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या उपक्रमाची नोंद होणार आहे. त्यासाठी गिनीज बुकची टीम दिल्लीत कार्यरत झाली आहे. योगाचे महत्त्व जगातील अनेक देशांनी मान्य केले आहे. भारतातही आता कुणाच्या मनात त्याविषयी संदेह राहिलेला नाही. जगातील अनेक नामवंतांकडून योगाच्या यशोगाथा सांगितल्या जातात. योगा करण्याचा त्यांना कसा लाभ झाला ते सांगितले जाते. मात्र, भारतात व जगात कधीच कुठे ३५ हजार लोकांनी एकत्रपणे योगाची विविध आसने केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच ही घटना ऐतिहासिक आहे. नाईक म्हणाले की, योगाचे महिनाभर प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही देशातील ६५० जिल्ह्यांमध्ये व्यवस्था केली होती. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक लाख रुपये देण्यात आले होते. या उपक्रमावर २५-३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.श्रीपाद नाईक म्हणाले, की देशातील अल्पसंख्याकांचा योगाला आक्षेप राहिलेला नाही. मुस्लिमधर्मीय बांधवांशीही आम्ही चर्चा केली आहे. कुराणात योगाला आक्षेप नाही. आम्ही चर्चा करून शंका निरसनही केले आहे. सर्व धर्मातील लोकांचा योग उपक्रमास पाठिंबा लाभला आहे. यात सर्वांचा सहभाग असेल.