शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

३० युवा शास्त्रज्ञांचा सन्मान

By admin | Updated: December 22, 2014 01:49 IST

पुरस्कार वितरण : ३७ संशोधकांना इंडियन नॅशनल सायन्स अकादमीची फेलोशिप

पणजी : इंडियन नॅशनल सायन्स अकादमीतर्फे रविवारी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावलेल्या ३० युवा शास्त्रज्ञांना २०१४ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यात मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रातील तीन युवा शास्त्रज्ञांचा समावेश होता. याशिवाय ३७ संशोधकांना संस्थेची फेलोशिप बहाल करण्यात आली. दोनापावल येथे एनआयओ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा. राघवेंद्र गदगकर यांच्या हस्ते फेलोशिप देण्यात आली. तंजावर येथील सास्त्रा विद्यापीठाच्या स्कूल आॅफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागाचे सहअध्यापक डॉ. व्यंकटेश पै यांना आधुनिक भाषेच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या वर्षाचा युवा विज्ञान इतिहासकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भौतिकशास्र आणि संस्कृतसाठीही त्यांनी भरीव काम केले आहे. भुवनेश्वरचे इन्स्टिट्यूट आॅफ फिजिक्सचे डॉ. संजीवकुमार अगरवाल, बंगळुरूच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे डॉ. सूर्यसारथी बोस, अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. सायन चक्रवर्ती, तिरुवअनंतपुरमच्या स्पेस रिसर्च सेंटरचे डॉ. विनित चंद्रशेखर नायर, मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे डॉ. अभिजीत चॅटर्जी, बंगळुरूच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे डॉ. सौम्या दास, दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ प्लांट जेनोम रिसर्चच्या डॉ. रोहिणी गर्ग, कोलकाताच्या सीएसआयआरमधील डॉ. ज्यून घोष, कोलकाताच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या डॉ. नीना गुप्ता. पुणे येथील आयआयएसईआर संस्थेचे डॉ. अमित प्रताप होगाडी, अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. सुकांता घोष, मुंबईच्या भाभा अणु ऊर्जा केंद्रातील मणिकृष्ण कर्री, अहमदाबाद विद्यापीठाचे आशुतोष कुमार, जोधपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे डॉ. महेश कुमार, लखनौच्या सीएसआयआरच्या डॉ. चारुलता, मुंबईच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे देवेंद्र मैती, इंदोरचे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे रजनीश मिश्रा, खडगपूरच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे अनिमेश मुखर्जी, बंगळुरूच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे शंतनू मुखर्जी, हैदराबादच्या डिफेन्स रिसर्च लॅबचे मिथुन पलित, पुणे येथील आयआयएसईआरच्या गायत्री पाननघट, दिल्लीच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे विमलेश पंत, भोपाळच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या मालक्ष्मी राधाकृष्णन, मुंबईच्या भाभा अणु ऊर्जा केंद्राचे प्रकाशचंद्र राऊत, कोइंबतूरच्या सलीम अली सेंटर फॉर नॅचरल हिस्टरीचे राम प्रताप सिंह, अलाहाबादच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे सुनीलकुमार सिंह, मुंबईच्या भाभा अणु ऊर्जा केंद्राचे आशिषकुमार श्रीवास्तव, दिल्लीतील सीएसआयआरचे गौरव वर्मा, बंगळुरूच्या नेहरू संशोधन केंद्राच्या डॉ. रजनी विश्वनाथ व दिल्लीतील नेहरू विद्यापीठाचे डॉ. विजय यादव यांचा यात समावेश होता. १९७४ पासून संस्थेतर्फे हे पुरस्कार दिले जातात. पदक, प्रमाणपत्र व रोख २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून ३५ वर्षांखालील शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनासाठी गौरविले जाते. फेलोशिपसाठी ३७० नामांकने आली होती, पैकी ३७ जणांची निवड केली. फेलोशिप प्राप्त झालेल्या नव्या सदस्यांनी या वेळी शपथ घेतली. विज्ञानाचा दर्जा उंचावण्यासाठी संशोधन करणार, असे ते म्हणाले. युवा शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी ५५७ नामांकने आली होती. त्यातील ३० जणांची निवड झाली. १९७४ पासून आजतागायत एकूण ७०८ शास्त्रज्ञांना पुरस्कार बहाल केले. तसेच दहा शिक्षकांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार दिले. मानपत्र व ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)