शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणावेळी समोर आला जुना खजिना, सापडले 14 व्या शतकातील मंदिराचे अवशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 16:46 IST

नावेली येथे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असताना केलेल्या खोदाईत हे अवशेष सापडले आहेत.

मडगाव - राष्ट्रीय महामार्गाच्या विस्ताराचे काम चालू असताना नावेली येथे जुन्या मंदिराचे अवशेष सापडले असून, त्यामुळे या भागात तो चर्चेचा विषय बनला आहे. हे अवशेष नेमक्या कुठल्या काळातील मंदिराचे हे तपासण्यासाठी लवकरच भारतीय पुरातत्व खात्याचे अधिकारी या परिसराला भेट देणार आहेत. नावेली येथील सेंट झेवियर्स चॅपेलच्या जवळ हे अवशेष सापडले असून,  पुरातनकाळी या परिसरात मंदिर होते हे स्पष्ट झाले आहे. एका स्थानिकाने या अवशेषांची माहिती पुरातत्व खात्याला दिल्याची माहिती या खात्याचे सहाय्यक अधीक्षक वरद सबनीस यांनी दिली.नावेली येथे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असताना केलेल्या खोदाईत हे अवशेष सापडले आहेत. मात्र कदाचित पोर्तुगिज काळात या जागेवर असलेले मंदीर पाडून त्या जागी ख्रिस्ती धर्मस्थळ उभारले असावे, ही शक्यता सबनीस यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, नावेलीतील सेंट झेवियर्सचे चॅपेल हे हल्लीच्या काळात बांधलेले आहे. त्यामुळे जुने मंदिर मोडून तिथे नवीन कपेल बांधले ही शक्यता नाही. मागच्या आठवडय़ात भारतीय पुरातत्व खाते आणि गोव्यातील पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पहाणी केली होती. या जागेची आम्हाला परत पहाणी करायची आहे. आणखीही काही अवशेष या ठिकाणी आहेत का हे शोधून काढण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

हे मंदीर 13व्या किंवा 14 व्या शतकातील असावे असा अंदाज आहे. मात्र नक्की कुठल्या काळातील हे अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या पाऊस असल्यामुळे रस्ता विस्ताराचे काम बंद करण्यात आले आहे. या जागेची पहाणी करण्यासाठी पुरातत्व खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे परवानगी मागण्याचे ठरविले आहे. हे अवशेष एक तर पुरातत्व खात्यात किंवा राज्य सरकारच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाhistoryइतिहास