शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

12th Exams : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 23:07 IST

Coronavirus Exam Cancelled : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय. ठरलेल्या निकषानुसार निर्णय घेणार.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय.ठरलेल्या निकषानुसार निर्णय घेणार.

पणजी : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्री केली. "कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. ठरलेल्या निकषानुसार निकाल जाहीर केला जाईल," असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, शिक्षण सचिव, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण खात्याचे संचालक, उच्च शिक्षण खात्याचे संचालक यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने गोव्यातही बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी ही महत्त्वाची बोलावली बैठक होती.राज्य सरकार सीबीएसई तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्याही संपर्कात होते. इतर राज्यांच्या शालांत व उच्च माध्यमिक मंडळांनी बारावीबाबत काय निर्णय घेतला आहे हे तपासून पाहिले आणि सायंकाळी उशिरा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. गेले काही दिवस शिक्षणतज्ज्ञ, शाळा प्रमुख, पालक- शिक्षक संघटना तसेच इतर संबंधित घटकांशी सरकार सल्लामसलत करत होते. तीन पर्यायही सरकारच्या विचाराधीन होते. एक तर परीक्षा पूर्णत: रद्द करणे, दुसरा पर्याय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना बसू देणे आणि ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांना अंतर्गत गुणांच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश देणे व दोन्हींचे निकाल एकत्रच जाहीर करणे, असे पर्याय होते. परंतु शेवटी या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.इयत्ता बारावीला कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखांसाठी सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना नीट, जेईई, जीसीईटी आदी परीक्षा देऊन पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावा लागतो. त्यामुळे या परीक्षांच्या बाबतीत केंद्राचा काय निर्णय होतो, याकडे आता विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपचाही विषय येतो. त्यामुळे त्याचे काय करावे, हादेखील एक प्रश्न आहे. सरकार काय उपाय काढते, याकडेही आता लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्राचे नवीन शैक्षणिक धोरण आगामी शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर लागू केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना दिली.  शैक्षणिक कृती योजना आणा : कामतविरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे." "तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच विद्यार्थ्यांच्या करिअर, भवितव्याबाबत निर्णय घेतला जावा, असे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत. सरकारने शैक्षणिक कृती योजना आणावी," अशी मागणी कामत यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाexamपरीक्षाPramod Sawantप्रमोद सावंत