जि.प.सभापतींनी केले मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:01:13+5:30

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दुचाकी अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. ६ नोव्हेंबर रोजी बुधवारला सायंकाळच्या सुमारास दुचाकीने शंकर गुरूनुले (३५) रा.नागेपल्ली आणि संजय काटवले (२९) हे दोन युवक दुचाकीने सिरोंचा मार्गाने जात होते.

ZP chairperson condolences family members of deceased | जि.प.सभापतींनी केले मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन

जि.प.सभापतींनी केले मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Next
ठळक मुद्देमदतीचे आश्वासन : अपघातात जीव गमावला

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दुचाकी अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.
६ नोव्हेंबर रोजी बुधवारला सायंकाळच्या सुमारास दुचाकीने शंकर गुरूनुले (३५) रा.नागेपल्ली आणि संजय काटवले (२९) हे दोन युवक दुचाकीने सिरोंचा मार्गाने जात होते. दरम्यान पातानील वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सागवानाच्या झाडाला दुचाकी आदळली. यात दोन्ही युवक जागीच ठार झाले.
दोन्ही युवकांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून हे दोन्ही युवक कमावते होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने दोन्ही कुटुंबावर मोठा आघात झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जि.प.च्या सभापती भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना करून शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी मदत करायला लावली. त्यानंतर शुक्रवारला स्वत: मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व आर्थिक मदत दिली. मृतकांच्या कुटुंबियांनी भाग्यश्री आत्राम यांना आपबित्ती सांगितल्यानंतर पुढेही भविष्यात कुटुंबियांना काही अडी-अडचण आल्यास आम्ही मदतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आत्राम यांनी बोलून दाखविले. यावेळी महेश येरावार, सांबय्या कंबालवार, संतोष गनपूरवार हजर होते.

Web Title: ZP chairperson condolences family members of deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.