जि.प. सीईओंनी केली बंधारा कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:34 IST2021-02-07T04:34:10+5:302021-02-07T04:34:10+5:30

लाेकमत न्यूज नेवटर्क काेरेगाव चाेप, कुरुड : जिल्हा विकास निधीअंतर्गत देसाईगंज तालुक्याच्या काेंढाळा येथे अलीकडेच साठवण बंधाऱ्याचे काम पूर्ण ...

Z.P. The CEO inspected the dam work | जि.प. सीईओंनी केली बंधारा कामाची पाहणी

जि.प. सीईओंनी केली बंधारा कामाची पाहणी

लाेकमत न्यूज नेवटर्क

काेरेगाव चाेप, कुरुड : जिल्हा विकास निधीअंतर्गत देसाईगंज तालुक्याच्या काेंढाळा येथे अलीकडेच साठवण बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी दाैरा काढून या बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी विभागीय जलसंधारण अधिकारी भाऊसाहेब चाैधरी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी बन्साेड, जि.प. सभापती राेशनी पारधी, सुनील पारधी, पंढरी नखाते, ग्रामपंचायत सदस्य नागमाेती, नितीन पाटील, शेतकरी दादाजी बुरले, शंकर ढाेरे, अन्नाती पारधी आदी उपस्थित हाेते. बंधाऱ्याच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या भागात धान व इतर पिकांची लागवड केली आहे. या भागात रबी हंगामातील उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. या बंधाऱ्यामध्ये पाणी साठून राहत असल्याने यंदाच्या उन्हाळी धानपिकाला सिंचन सुविधा उपलब्ध हाेणार आहे.

Web Title: Z.P. The CEO inspected the dam work