दुचाकीच्या धडकेने युवक जखमी

By Admin | Updated: April 3, 2017 02:34 IST2017-04-03T02:34:26+5:302017-04-03T02:34:26+5:30

येथील भारतीय स्टेट बँकेसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत युवक जखमी झाला.

Youth wounded by bike shock | दुचाकीच्या धडकेने युवक जखमी

दुचाकीच्या धडकेने युवक जखमी

रूग्णालयात केले भरती : एसबीआयसमोर झाला अपघात
आरमोरी : येथील भारतीय स्टेट बँकेसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत युवक जखमी झाला. सदर अपघात ३१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडला.
रशीद शेख रा. गांगलवाडी ता. ब्रह्मपुरी असे जखमी युवकाचे नाव आहे. शुक्रवारी आरमोरी येथील आठवडी बाजार असल्याने प्रमुख मार्गावर वाहनांची फार मोठी वर्दळ होती. दरम्यान ब्रह्मपुरी मार्गे आरमोरी शहरात येणाऱ्या व विरूध्द दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांची जोरदार धडक झाली. यात दोन युवक गंभीर जखमी झाले. जखमींना आष्टा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रभाकर गडपायले यांनी रूग्णालयात भरती केले. त्याचबरोबर अपघाताची माहिती रशीद शेख यांच्या कुटुंबियांना दिली. काही वेळानंतर शेख यांचे कुटुंबिय आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले. शेख यांच्या कुटुंबियांनी गडपायले यांच्या कामाचे कौतुक केले. बाजाराच्या दिवशी स्टेट बँकेसमोर वाहनांची मोठी गर्दी राहत असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. (वार्ताहर)

Web Title: Youth wounded by bike shock