शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेस लोकप्रतिनिधींना जागविणार

By admin | Updated: July 12, 2015 02:03 IST

जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला अनेक आश्वासने दिली होती.

गडचिरोली : जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला अनेक आश्वासने दिली होती. मात्र भाजपप्रणीत सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही अनेक महत्त्वाचे प्रश्न कायम आहे. या प्रश्नासंदर्भात आमदार व खासदारांनी आगामी पावसाळी अधिवेशनात आवाज उचलावा, याकरिता जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने रविवारी आमदार व खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, जिल्हा काँग्रेसचे महासचिव सतिश विधाते, महेंद्र बावनवाडे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माहिती देताना पंकज गुड्डेवार व महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले, ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या पेसा कायद्यासंदर्भातील अधिसूचनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गैरआदिवासी युवकांचे नोकरीचे दारे बंद झाली आहेत. जिल्हा निवड मंडळ स्थापन न झाल्यामुळे स्थानिक उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात यावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, जातनिहाय जनगणना तत्काळ जाहीर करावी, शेतकऱ्याच्या धानाला प्रतीक्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव देण्यात यावा, आदींसह विविध मागण्यांकरिता आमदार, खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील भाजपच्या आमदार, खासदारांनी जिल्ह्याच्या एकाही प्रश्नावर आवाज उठविला नाही. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात जिल्ह्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होऊन सदर प्रश्न मार्गी लागावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी पत्रकार परिषदेला लता पेदापल्ली, अमोल भडांगे, अशोक चलाख, आकाश सादिलवार, गौरव अलाम, राहुल मुनघाटे, नितेश राठोड आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)