शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

यंदा श्रावण 29 दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. महिनाभर अनेक भाविक व्रतवैकल्य, पूजापाठ व उपास करतात. दर साेमवारी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळते. अनेक जण महिनाभर मांसाहार करीत नाही. तसेच वर्ज्य असलेले कार्यक्रम अथवा समारंभ आयाेजित करीत नाही. दर साेमवारी उपास करून आराधना करतात. विशेषत: शिव मंदिरांमध्ये भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. त्यामुळे श्रावण महिन्याला महत्त्व आहे.

ठळक मुद्देभाविकांचा सवाल : दीड वर्षांपासून बाहेरूनच घ्यावे लागताहे दर्शन

गोपाल लाजुरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटनस्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविक घरीच पूजापाठ व अन्य विधी उरकतात. यंदा पहिला श्रावण-साेमवार ९ ऑगस्ट राेजी येणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात तरी भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार काय, असे वेध लागले आहेत. यावर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा आहे. श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. महिनाभर अनेक भाविक व्रतवैकल्य, पूजापाठ व उपास करतात. दर साेमवारी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळते. अनेक जण महिनाभर मांसाहार करीत नाही. तसेच वर्ज्य असलेले कार्यक्रम अथवा समारंभ आयाेजित करीत नाही. दर साेमवारी उपास करून आराधना करतात. विशेषत: शिव मंदिरांमध्ये भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. त्यामुळे श्रावण महिन्याला महत्त्व आहे. यावर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा असून पाच साेमवार येत आहेत. काेराेनाचे सावट असल्याने यंदा तरी मंदिरात प्रवेश मिळणार काय, असा प्रश्न भाविकांना सतावत आहे.

व्यावसायिक म्हणतात, साहित्य विक्री मंदच

काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी विविध प्रतिष्ठाने शासनाने बंद ठेवली. धार्मिक स्थळेही बंद आहेत. गेल्या दीड वर्षात पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा बुडाला. अनेक जणांनी पर्यायाने दुसरा धंदा सुरू केला. यातच आता उपजीविका चालवावी लागत आहे. उन्हाळ्यात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने काही प्रमाणात साहित्य विक्रीची दुकाने सुरू आहेत. परंतु दर्शनासाठी माेजकेच भाविक येतात.- नारायण शेबे, व्यावसायिक 

मंदिरांच्या बाहेर पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये बहुतांश महिला व्यावसायिक आहेत. ज्या महिला निराधार किंवा एकल आहेत अशा महिला या व्यवसायात आहेत. याच व्यवसायावर त्या उपजीविका करीत आहेत. परंतु काेराेनामुळे महिलांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. दीड वर्षात धंदा बुडाला. अनेक वर्षांची मिळकतही आता राहिली नाही. त्यामुळे शासनाने मदत करावी.- कविता बाेंद्रे, व्यावसायिक 

९ पासून श्रावण

९ ऑगस्टपासून श्रावण-साेमवार सुरू हाेत आहेत. परंतु मंदिरे बंद आहेत. तरीसुद्धा काही मंदिरांच्या बाहेर पूजा साहित्य विक्री करणारी दुकाने आहेत. येथील साहित्य खरेदी करून भाविक बाहेरूनच दर्शन घेतात. ते आतमध्ये प्रवेश करीत नसल्याने मंदिराला देणगीही देऊ शकत नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिर