शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आदिवासी दिन, लोकबिरादरी प्रकल्पात वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST

आदिवासी संस्कृती आणि पर्यावरण यांचा अगदी जवळचा संबंध आहे. जंगल व जंगलात वावरणारे पशुपक्षी, कीटक व अन्य जीवजंतू यामुळे ...

आदिवासी संस्कृती आणि पर्यावरण यांचा अगदी जवळचा संबंध आहे. जंगल व जंगलात वावरणारे पशुपक्षी, कीटक व अन्य जीवजंतू यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे वृक्षांना फार महत्त्वाचे स्थान आहे. त्याकरिता दरवर्षी लोकबिरादरी प्रकल्पातर्फे वृक्षदिंडी काढून जागतिक आदिवासी गौरवदिनी वृक्षारोपण केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जागतिक आदिवासी गौरवदिनाचे औचित्य साधून प्रकल्पाच्या जागेवर विविध जातींच्या रोपट्याचे रोपण करण्यात आले.

सर्वप्रथम वृक्षदिंडी काढण्यात आली. पर्यावरणावर आधारित विविध घोषणा देत आश्रमशाळा ते प्राणी अनाथालयाच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत वृक्षदिंडी पोहचली. तद्नंतर क्रांतिवीर बिरसा मुंडा, कर्मयोगी बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांपुढे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी मुंबई येथील वास्तुविशारद मार्बन आणि ऊर्मी, लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे, प्राचार्य डॉ. विलास तळवेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर येम्पलवार, मुख्याध्यापक शरीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रमांतर्गत प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबांतील सदस्यांनी व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींचे रोपटे लावले. यामध्ये जाईंट बांबू, ब्रॅन्डीस बांबू, अपल बोर, फणस, अव्हाकोडा, अंजीर, काळा जांब, स्टार फ्रूट, कलमी चिंच, रिठा, आवळा, लाँजस टोनिया, फालसा, टेबुबिया, व्हॉट्स ॲपल, कापूर, चकोतरा, जांभूळ, मिलन टोनिया, खैर, दशहरी आंबा, बारमाही आंबा, आम्रपाली आंबा, लंगडा आंबा, लिची, अंजीर, संत्रा, शहतूत आदी वृक्षांचे रोपटे लावण्यात आले. वृक्षारोपणाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक विवेक दुबे व चमूने सहकार्य केले.

090821\05261647-img-20210809-wa0012.jpg

लोकबिरादरी प्रकल्पात विध्यार्थी व तेथील कर्यकर्ते व्रुक्षारोपन करताना