शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम

By admin | Updated: July 12, 2015 02:07 IST

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये शनिवारी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.


गडचिरोली : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये शनिवारी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकसंख्या वाढीची कारणे व दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. जी. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. डॉ. भूषण आंबेकर उपस्थित होते. लोकसंख्या वाढीचे जगावर होणारे दुष्परिणाम याबाबत म्हशाखेत्री यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार स्वयंसेविका अश्विनी भीसे यांनी मानले.
आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय, देसाईगंज : निरंतर प्रौढ शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे होते. प्रमुख अतिथी म्हणून जे. पी. देशमुख, डॉ. एस. जी. गहाणे, प्रा. रमेश धोटे, प्रा. डॉ. व्ही. जी. चव्हाण उपस्थित होते. ‘आर्थिक विकासात लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम’ या विषयावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चंद्रशेखर क्षीरसागर याने प्रथम तर महेश मोतिराम दिवठे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. डी. एन. कामडी, प्रा. डॉ. एच. बी. धोटे, व प्रा. निहार बोदेले यांनी काम पाहिले. वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी, बेकारी, दरिद्री, उपासमारी, कुपोषण आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्येवर आळा घालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाळबुद्धे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षीरसागर तर आभार प्रा. रमेश धोटे यांनी मानले.
भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय : राष्ट्रीय सेवा योजना व निरंतर शिक्षण विभाग, विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुधीर भगत, प्रा. निकुडे, प्रा. डॉ. कोंगरे, प्रा. एस. डी. मैंद, प्रा. पतीवार, प्रा. डॉ. पाटील, प्रा. डांगे, प्रा. बुरबुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी विश्वनाथ दरेकार यांनी तर आभार प्रा. नीलेश दुर्गे यांनी मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)