बालभवन निर्मितीवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:24+5:302021-01-16T04:40:24+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क धानाेरा : पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता व गुणवत्तांचा विकास करण्याच्या उद्देशाने बालभवन निर्माण केले ...

Workshop on construction of Bal Bhavan | बालभवन निर्मितीवर कार्यशाळा

बालभवन निर्मितीवर कार्यशाळा

लाेकमत न्यूज नेटवर्क

धानाेरा : पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता व गुणवत्तांचा विकास करण्याच्या उद्देशाने बालभवन निर्माण केले जाणार आहे. बालभवन कसे बनवावे, याबाबत चर्चा करण्यासाठी इरूपटाेला व काेसमी केंद्राच्या वतीने कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले. कार्यशाळेचा शुभारंभ विस्तार अधिकारी सुधीर आखाडे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा काेर्ट कमिटीचे सदस्य केंद्रप्रमुख राजेश वडपल्लीवार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक सुनील चरडुके, भुजंगराव नारवनरे, गणेश आखाडे, विलास सिडाम, मतकेर पाेटावी, माेहन दाेडके, अशाेक दहिकर, नीलकंठ निकुरे, पी.जी. श्रीकाेंडावार, ए.एस. लिंगावार, पी.एस. गायकवाड, व्ही.व्ही. रामगिरवार, बी.बी. उसेंडी, बी.एन. बुरमवार, जी.व्ही. राऊत, डी.यू. समर्थ, एस.एस. दूधबावरे आदी उपस्थित हाेते.

शाळेत हवामान तक्ता, पाऊस आलेख, तापमान आलेख, हजेरी तक्ता, शब्दशाेध पाटी, दिनदर्शिका, विविध अंक, अक्षरांचे कटआउट, बालभवन बाेर्ड, चित्र कार्ड, स्वरचिन्ह तयार करण्यात आले. शैक्षणिक साहित्यांमुळे विद्यार्थ्यांना अध्ययन करणे साेपे हाेणार आहे.

Web Title: Workshop on construction of Bal Bhavan