शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:24 IST

गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । निविदा निघाली; बांधकाम सुरू होईपर्यंत महामार्गाची डागडुजी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.केंद्र शासनाने गडचिरोली शहरातून चारही मार्गाने जाणाऱ्या राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. त्यातील चंद्रपूर ते धानोरा तालुक्यातील मुरूमगावपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामापैकी मूल ते गडचिरोली पर्यंतच्या कामाचे कंत्राट काढून कामाला सुरूवात झाली आहे. तसेच ब्रह्मपुरी-आरमोरी मार्ग सुध्दा बांधला जात आहे. गडचिरोली ते आष्टी या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला होता. या मार्गाचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरणने या कामाची निविदा काढली आहे. २१ आॅगस्टपर्यंत निविदा मागविण्यात आल्या असून २३ आॅगस्ट रोजी उघडल्या जाणार आहेत. निविदा उघडल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊन लवकरच कामाला सुरूवात होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांनी दिली आहे.दुरूस्ती रखडल्याने मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्यगडचिरोली-आष्टी महामार्गाचे नव्याने बांधकाम केले जाणार असल्याने या महामार्गाची मागील एक वर्षापासून डागडुजी केली नाही. त्यामुळे या महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघातांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की खड्डा चुकविणे अशक्य झाले आहे. महामार्गाचे पूर्ण बांधकाम होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सद्य:स्थितीत असलेल्या डांबरी रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास वाहनधारक व प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.काही ठिकाणी डांबर तर काही ठिकाणी काँक्रीटगडचिरोली ते विज्ञान महाविद्यालयापर्यंत सिमेंट काँक्रीट राहणार आहे. विज्ञान महाविद्यालय ते शिवणीपर्यंत डांबरी रस्ता राहिल. शिवणी ते चामोर्शीपर्यंत काँक्रीटचे बांधकाम होईल. चामोर्शी ते आष्टीपर्यंत पुन्हा डांबरी रस्ताच राहणार आहे. येनापूरजवळ तीन किमी अंतराचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम होईल. काही भागात जंगल असल्याने शासन निर्णयानुसार सिमेंट काँक्रीट ऐवजी डांबरचे रोड तयार केले जाणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अभियंता नितीन बोबडे यांनी दिली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग