महिलांना मिळणार नर्सिंग प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:26+5:302021-01-16T04:40:26+5:30

कुरखेडा : जिल्हा पोलीस दल नागरिक कृती समिती यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे पार्कसन्स स्किल इन्स्टिट्यूट, ...

Women will get nursing training | महिलांना मिळणार नर्सिंग प्रशिक्षण

महिलांना मिळणार नर्सिंग प्रशिक्षण

कुरखेडा : जिल्हा पोलीस दल नागरिक कृती समिती यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे पार्कसन्स स्किल इन्स्टिट्यूट, नागपूर यांच्यावतीने मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नर्सिंग प्रशिक्षण कोर्सची माहिती देऊन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात १०५ मुली व महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पार्कसन्स स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, नागपूरचे को-आर्डिनेटर योगेश रासेकर, ठाणेदार सुधाकर देडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर केदार, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने उपस्थित होते. १८ ते ३५ वयोगटातील मुली व महिलांकरिता शासनातर्फे नि:शुल्क असलेल्या तीन महिन्यांच्या प्रशिक्षणाची माहिती योगेश रासेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल नवाळे यांनी केले तर पोलीस हवालदार उमेश नेवारे यांनी आभार मानले.

Web Title: Women will get nursing training