शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी फोडले ग्रा.पं. समोर पाण्याचे माठ

By admin | Updated: May 13, 2014 23:35 IST

कुरखेडा मुख्यालयात गेल्या महिन्याभरापासून होत असलेल्या अपुर्‍या पाणी पुरवठय़ाच्या विरोधात मंगळवारी महिलांनी आयोजित महिला ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या

कुरखेडा : कुरखेडा मुख्यालयात गेल्या महिन्याभरापासून होत असलेल्या अपुर्‍या पाणी पुरवठय़ाच्या विरोधात मंगळवारी महिलांनी आयोजित महिला ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर माठ फोडून आपला राग व्यक्त केला.

यावेळी वार्डातील नंदा खोबरे, ताना नरोटे, मंदा मानकर, शालू रोकडे, वर्ष मानकर, जिजा खोबरे, शारदा हलामी, यशोदा हलामी, पठाण बी, शैजा उसेंडी, जिजा तुलावी, रुपाली बनपुरकर , सुमन हरामी, कुंता तुलावी, धनराज लाकडे आदी उपस्थित होते. कुरखेडा गावात सती नदीवरून संपूर्ण गावाला ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेमार्फत पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरातील सर्व भागात योग्य प्रकारे पाणी पुरवठा केला जात नाही. त्यातच अनेक ठिकाणी ग्रामपंचायतमार्फत पाणी पुरवठा सुरू होताच नागरिक टिल्लूपंप लावून पाणी ओढून घेतात. त्यामुळे अन्य नागरिकांना नळाद्वारे पाणीच मिळत नाही. उन्हाळ्याच्या दिवसा पाण्याचा पुरवठा कमी त्यातही टिल्लूपंपाने पाणी ओढून घेण्याचे प्रकार सुरू असल्याने शहरातील अनेक भागात पाण्याचा पुरवठा होत नाही. ग्रामपंचायतीमार्फत टिल्लूपंप लावणार्‍यांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी आज ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेवर धडक देऊन आपला संताप व्यक्त केला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते धनराज लाकडे यांनी यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाला या प्रश्नावर लेखी निवेदनही दिले आहे. कुरखेडा येथील नवीन पाणी पुरवठा योजनेचा बांधकामाकरीता १ कोटी पेक्षा अधिक खर्च होऊनही संबंधित अधिकारी व कंत्राटदाराचा नियोजन शुन्यतेमुळे योजना निकामी ठरलेली आहे. परिसरातील अनेक पाणी पुरवठा योजना विभागाच्या उदासिनतेने रखडत आहे. (शहर प्रतिनिधी)