काेराेनाची लस घेण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 05:00 AM2021-06-13T05:00:00+5:302021-06-13T05:00:18+5:30

काेराेनाची साथ थाेपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. आता मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी उपकेंद्र स्तरावर लसीकरणाची साेय केली आहे, तसेच एखाद्या माेठ्या गावात लसीकरण शिबिराचे आयाेजन केले जात आहे.

Women lag behind men in carnage vaccination | काेराेनाची लस घेण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मागे

काेराेनाची लस घेण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मागे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाची लस घेण्यात जिल्ह्यातील महिला पुरुषांच्या तुलनेत बऱ्याच मागे असल्याचे दिसून येते. एकूण १ लाख ८६ हजार २५० नागरिकांनी लस घेतली आहे. त्यात ७९ हजार ८६१ पुरुष व ६६ हजार ६९६ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत १३ हजार १६५ कमी महिलांनी लस घेतली आहे. 
काेराेनाची साथ थाेपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. आता मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी उपकेंद्र स्तरावर लसीकरणाची साेय केली आहे, तसेच एखाद्या माेठ्या गावात लसीकरण शिबिराचे आयाेजन केले जात आहे. तरीही पाहिजे त्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातही महिलावर्ग लसीकरणास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

काेरची तालुका लसीकरणात सर्वांत मागे
काेरची तालुक्यात तीनच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. या तीन केंद्रांवर आजपर्यंत केवळ ३ हजार ९८९ नागरिकांनीच लस घेतली आहे. काेरची तालुका विस्ताराने माेठाच आहे, तसेच अर्धा भाग ग्रामीण व अर्धा भाग दुर्गम आहे. तरीही या तालुक्यातील केवळ ३ हजार ८९८ नागरिकांनी लस घेणे चिंतेचा विषय आहे. त्यानंतर भामरागड तालुक्याचा क्रमांक लागतो. या तालुक्यातील केवळ ४ हजार ३६८ नागरिकांनी लस घेतली आहे. गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास तयार नाहीत. 

 

Web Title: Women lag behind men in carnage vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.