शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी १०० ड्रम गुळसडवा केला नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:43 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्याच्या बोरी गावालगत प्राणहिता नदीच्या परिसरात दारू गाळणाऱ्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली. यात तब्बल १०० ड्रम गुळसडवा नष्ट करण्यात आला.

ठळक मुद्देपाच तास चालली कारवाई : दारू गाळणारे घटनास्थळावरून फरार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्याच्या बोरी गावालगत प्राणहिता नदीच्या परिसरात दारू गाळणाऱ्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली. यात तब्बल १०० ड्रम गुळसडवा नष्ट करण्यात आला. तसेच दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व ड्रम जाळून नष्ट केले.राजपूर पॅच येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी सोमवारी ही कारवाई केली. यावेळी अहेरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. अहेरीपासून २० किमी अंतरावरील बोरी गावालगत असलेल्या प्राणहिता नदीवर गावठी दारू गाळण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. उन्हाळ्यामुळे नदीपात्राचा काही भाग कोरडा पडत असल्याने नदीमधील झाडाझुडपांमध्ये हा सडवा लपून ठेवला जातो. राजपूरपॅच व बोरी या दोन्ही गावातील लोक दारू गाळण्याचे काम करतात. चार दिवसांपूर्वी राजपूरपॅच येथील महिलांनी दिना नदी परिसरात असलेला गुळसडवा नष्ट केला होता.सडव्याचे साठे बोरी गावालगतच्या प्राणहिता नदी परिसरात असल्याची माहिती राजपूरपॅच येथील महिलांना मिळाली होती. त्यांनी बोरी येथील महिलांना याबाबत माहिती देत अहिंसक कृती करण्याचे आवाहन केले. पण बोरी येथील महिला तयार नसल्याने राजपूरपॅच येथीलच महिला व युवकांनी कृती करण्याचा निर्णय घेतला. बोरी येथील पोलीस पाटील सत्यवान मोहुर्ले कारवाईत सहभागी झाले.अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी हवालदार घाटघुमर यांना कारवाईसाठी घटनास्थळावर पाठविले. या धडक कारवाईत नदी परिसरात गुळसडवा भरून ठेवलेले प्लास्टिक ड्रम महिला व युवकांनी नष्ट केले. महिला व पोलिसांना पाहून दारू गाळणाऱ्यांनी पळ काढला.

टॅग्स :liquor banदारूबंदी