शिफा प्रकरणात एलसीबीकडून साक्षीदारांचे बयान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:48+5:30

देसाईगंजमध्ये आधी महिलावर्गाच्या मार्फत स्वस्त दरात विविध वस्तू देणाऱ्या शिफाच्या जाळ्यात अनेक लोक ओढल्या गेले. त्यानंतर नागरिकांनी विविध प्रकारच्या वस्तूंसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक तिच्याकडे केली. पण शिफाने तिच्याकडे विविध वस्तूंसाठी अग्रिम स्वरूपात जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता.

Witness statement from LCB in Shifa case continues | शिफा प्रकरणात एलसीबीकडून साक्षीदारांचे बयान सुरू

शिफा प्रकरणात एलसीबीकडून साक्षीदारांचे बयान सुरू

Next
ठळक मुद्देपुरवणी तपास : पडद्यामागील आरोपी समोर येणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज येथील बहुचर्चित शबाना ऊर्फ शिफा मोहम्मद चौधरी या महिलेच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक झालेल्या प्रकरणाचा पुरवणी तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या प्रकरणातील साक्षीदार महिलांचे बयाण घेण्याचे काम सुरू असून त्यामार्फत पोलीस या प्रकरणाचा पाया अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या प्रकरणात पडद्यामागे असलेले आरोपी आतारी समोर येणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
देसाईगंजमध्ये आधी महिलावर्गाच्या मार्फत स्वस्त दरात विविध वस्तू देणाऱ्या शिफाच्या जाळ्यात अनेक लोक ओढल्या गेले. त्यानंतर नागरिकांनी विविध प्रकारच्या वस्तूंसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक तिच्याकडे केली. पण शिफाने तिच्याकडे विविध वस्तूंसाठी अग्रिम स्वरूपात जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. वर्षभरापूर्वी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर देसाईगंज पोलिसांनी शिफा व तिचा भाचा यांना उत्तर प्रदेशातून अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. पण या प्रकरणातील अनेक बाजू अजून पुढे आल्या नसल्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पुरवणी तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अजूनही पडद्यामागे असलेल्या आरोपींची नावे पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आतापर्यंत एलसीबीने जवळपास १८ महिलांचे बयान घेतले असून अजून बºयाच लोकांचे बयाण बाकी आहेत. त्यामुळे तपासाला वेळ लागला तरी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात तो योग्य प्रकारे होईल, असा विश्वास तपास अधिकारी पो.निरीक्षक उल्हास भुसारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. सध्या शिफा आणि तिचा भाचा न्यायालयीन कोठडीत आहेत.

नातेवाईकांचीही केली होती फसवणूक
देसाईगंज शहरातील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून कोट्यवधीचा चुना लावणाºया शिफाने आपल्या नातेवाईकांनाही सोडले नव्हते. २०१२ मध्ये तिने आपल्या सासºयाचा प्लॉट विकून लाखो रुपये कमविले होते. या प्रकरणी तिच्या विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मागील पाच वर्षांपासून देसाईगंजात वास्तव्यास असलेल्या शबाना ऊर्फ शिफा मोहम्मद चौधरी ही देसाईगंजात ब्युटी पार्लरचा लहानसा व्यवसाय करीत होती. मात्र कोट्यवधीचा चुना लावल्यानंतर तिचे नाव एकदम चर्चेत आले होते. परंतु तिची पूर्वपार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याची बाब आधी लोकांना माहीत नसल्यामुळे ते तिच्या जाळ्यात ओढल्या गेले होते.

Web Title: Witness statement from LCB in Shifa case continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.