शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढविणार

By admin | Updated: January 17, 2016 01:18 IST

भाजप पक्षाच्या वतीने आपली पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पत्रकार परिषद : अशोक नेते यांची माहितीगडचिरोली : भाजप पक्षाच्या वतीने आपली पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. खासदार म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे मुळीच दुर्लक्ष न करता येत्या तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात भाजपचे पक्ष संघटन वाढविण्यावर आपला भर राहिल, अशी माहिती भाजपचे नवनिवयुक्त गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी शनिवारी सर्कीट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाध्यक्ष पदावर आपली बिनविरोध निवड झाल्यामुळे पक्ष संघटनेबाबत माझ्यावरील जबाबदारी दुपटीने वाढली आहे. येत्या तीन वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. सोबतच लोकसभा व विधानसभाही निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकीत माझ्या नेतृत्वात भाजप पक्षाच्या वतीने लढविण्यात येईल, असेही खासदार नेते यावेळी म्हणाले. जिल्ह्याचे भाजप पक्षात माझ्या नेतृत्वात कोणतीही गटबाजी राहणार नाही. सर्वांना सोबत घेऊन पूर्ण प्रामाणिकपणे आपण जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देणार, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्नावर आपण गतीने पाठपुरावा करणार, असेही ते म्हणाले. माझ्या नेतृत्वात भाजपची जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात येणार असून सर्व आघाड्या व सेलच्या पदावर जुन्या, नव्या नेत्यांना संधी देऊन पक्ष संघटनेत समानता आणण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे ते यावेळी म्हणाले.पत्रकार परिषदेला आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, रामेश्वर सेलुकर, नाना नाकाडे, रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, सुधाकर येनगंधलवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)