शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

राज्यातील जवळपास  संपूर्ण जिल्ह्यात डी.सी.पी.एस.धारकांना पहिला हप्ता रोखीने मिळाला आहे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक,  इतर विभागाचे  कर्मचारी, खासगी अनुदानित प्राथमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देण्यात आला आहे; मात्र जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शिक्षकांना अजूनपर्यंत सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता गेल्या दोन वर्षांपासून मिळालेला नाही.

ठळक मुद्देखासगी शाळेतील माध्यमिक शिक्षकांचा प्रश्न

लाेकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची वाढीव वेतनाची थकबाकी राज्य सरकार पाच समान हप्त्यांत व पाच वर्षांत रोखीने देणार होते; मात्र जिल्ह्यातील खासगी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयाेगाच्या थकबाकीचा पहिला हप्ताही देण्यात आला नाही. पहिला हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती योजना अथवा भविष्य निर्वाह निधी योजना लागू नाहीत अशाच कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता रोखीने मिळणार असल्याचे शासन  अध्यादेशात नमूद आहे. प्रत्येक वर्षात १ जुलै रोजी ही रक्कम अदा केली जाईल. म्हणजे जून महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे. असे सांगण्यात आले होते. राज्यातील जवळपास  संपूर्ण जिल्ह्यात डी.सी.पी.एस.धारकांना पहिला हप्ता रोखीने मिळाला आहे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक,  इतर विभागाचे  कर्मचारी, खासगी अनुदानित प्राथमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देण्यात आला आहे; मात्र जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शिक्षकांना अजूनपर्यंत सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता गेल्या दोन वर्षांपासून मिळालेला नाही. एकीकडे शासन जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना तसेच इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाचा पहिला हप्ता देऊ करतो; मात्र खासगी अनुदानित विद्यालयातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा पहिला हप्ता द्यायला उशीर करीत जाणूनबुजून शासन दुजाभाव करीत असल्याचे चित्र दिसत आहे.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळाला आणि दुसरा व तिसरा हप्ता शासन देईलच; मात्र  जिल्ह्यातील खासगी अनुदानित विद्यालयातील माध्यमिक  कर्मचाऱ्यांना अजूनही सातव्या वेतन आयोगाचा पहिलाच हप्ता मिळाला नाही तर दुसरा व तिसरा हप्ता कसा मिळेल, असा प्रश्न शिक्षकांच्या मनात पडत आहे, त्यामुळे लवकरात लवकर पहिल्या हप्त्याच्या थकबाकीच्या निधीची तरतूद करून व्याजासकट जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित माध्यमिक कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी जिल्ह्यातील  शिक्षक संघटना करीत आहेत. 

एकच उत्तर, प्रस्ताव तयार आहेमार्च महिन्यात वाटत होते की समस्त माध्यमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळेल; पण निधीच्या कमतरतेचे कारण पुढे करून व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, माध्यमिक शिक्षकांच्या तुलनेत कमी असल्यामुळे त्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यामुळे वेतन अधीक्षक पथक गडचिरोली यांचा दुट्टपीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी जेव्हा जेव्हा वेतन अधीक्षकांना पहिल्या हप्त्यासाठी विचारणा करण्यासाठी जात असतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे एकच उत्तर  असते ते म्हणजे सर्व प्रस्ताव तयार आहे. फक्त निधी उपलब्ध नाही. निधीची तरतूद झाल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात रक्कम टाकण्यात येईल, असे उत्तर दिले.

 

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगTeacherशिक्षक