शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

आता अवघ्या महिनाभरात पडणार काय जिल्ह्यात 445 मिमी पाऊस ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला हाेता. मात्र मागील तीन महिन्यांमधील पावसाची स्थिती लक्षात घेतली तर हवामान खात्याचा अंदाज खाेटा ठरला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागांत अजूनही जेमतेम ५० टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे तलाव, बाेड्या अर्धवटच भरल्या असल्याचे दिसून येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत गडचिराेली जिल्ह्यात सरासरी १२५४.१ मिमी पाऊस पडतो. या वर्षी १ जून ते  ३१ ऑगस्टपर्यंत केवळ ८०९.१ मिमी पाऊस पडला आहे. दरवर्षीच्या वार्षिक सरासरी गाठण्यासाठी सप्टेंबर या एका महिन्यात ४४५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. एवढा पाऊस पडणार काय? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला हाेता. मात्र मागील तीन महिन्यांमधील पावसाची स्थिती लक्षात घेतली तर हवामान खात्याचा अंदाज खाेटा ठरला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागांत अजूनही जेमतेम ५० टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे तलाव, बाेड्या अर्धवटच भरल्या असल्याचे दिसून येत आहे. 
काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने धानाचे राेवणे झाले नव्हते. आता दाेन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राेवणे सुरू केले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी जमीन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
आतापर्यंत सिराेंचा तालुक्यात सर्वाधिक तर सर्वात कमी पाऊस धानाेरा तालुक्यात झाला आहे.

केवळ ७६ टक्केच पाऊस
१ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०६५.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र केवळ ८०९.१ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. तीन महिन्यांच्या सरासरीच्या केवळ ७५.९ टक्केच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला नाही. काही तालुक्यांमध्ये तर केवळ ७० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. 

यावर्षी एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही

ऑगस्ट महिन्यात दरवर्षी गडचिराेली जिल्ह्याला पुराचा फटका बसतो. मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्याने एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही. नदी, नाल्यांमध्येसुद्धा पुरेसे पाणी नाही. दाेन दिवसांपूर्वी जिल्ह्यात कडक ऊन पडत हाेते. त्यामुळे धानपिकाला माेटारपंपाचे पाणी द्यावे लागत हाेते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. उन्हाळ्यात काय हाेणार याचीही चिंता आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस