शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वे अनलॉक कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

शासनाने लोकडाऊनच्या काळात पॅसेंजर रेल्वे सुरू केली नसली तरी मालवाहू गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. वडसावरून सध्याच्या परिस्थितीत  दररोज  ३० मालवाहू गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्याचा मोबदला मिळत आहे. तरी पॅसेंजर रेल्वे सुरू केली तर सामान्य जनतेसाठी मोठी गैरसोय दूर होणार आहे. 

दयाराम फटिंगलाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कोरोनाचा संसर्ग सामान्य जनतेला होऊ नये यासाठी शासनाने दीड वर्षापूर्वी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करून सर्व पॅसेंजर रेल्वे बंद केल्या. आजघडीला कोरोना बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. त्यामुळे सर्व व्यवहार हळूहळू ‘अनलॉक’ होत आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच अजूनही लॉक का? असा प्रश्न तमाम रेल्वे प्रवाशांच्या मनात उठत आहे.कोविड-१९ या   संसर्गजन्य विषाणूचा  जनतेच्या  आरोग्यावर परिणाम होऊ नये तसेच त्यांचा बळी जाऊ नये म्हणून केंद्र शासनाने मार्च २०२० ला लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. यात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन अनेकांचा बळीही गेला. मात्र आता दुसरी लाट जवळजवळ संपण्याच्या स्थितीत असल्यानेच इतर व्यवहारांमध्ये शासनाने सूट दिली आहे. एसटी बसेसचा प्रवास तर खूप आधीपासून सुरू आहे. एवढेच नाही तर अनेक एक्स्प्रेस गाड्याही सुरू झाल्या. मग सामान्य जनतेच्या पॅसेंजर रेल्वे प्रवासासाठीच आडकाठी का, असा प्रश्न केला जात आहे. शासकीय नियमांच्या अधीन राहून पॅसेंजर रेल्वे  सुरू कराव्यात अशी प्रवाशांची भावना आहे. 

मालवाहू वाहनातून वाढली कमाई

शासनाने लोकडाऊनच्या काळात पॅसेंजर रेल्वे सुरू केली नसली तरी मालवाहू गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. वडसावरून सध्याच्या परिस्थितीत  दररोज  ३० मालवाहू गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्याचा मोबदला मिळत आहे. तरी पॅसेंजर रेल्वे सुरू केली तर सामान्य जनतेसाठी मोठी गैरसोय दूर होणार आहे. 

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्यामुळे इतर बाबीप्रमाणे शासकीय नियमांच्या अधीन राहून ज्या प्रवाशांनी  कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले असतील, त्यांना तसे प्रमाणपत्र दाखवून किंवा तसे नसेल तर आरटीपीसीआर  चाचणीचा अहवाल दाखवून  प्रवासाची संधी दिली जाऊ शकते. यात दररोज किमान एक पॅसेंजर रेल्वे सोडली तरी प्रवाशांची बरीच सोय होईल.  - रितेश कुमार, स्टेशन मास्टर, वडसा

दररोज चालायच्या ८ पॅसेंजर, १५०० पर्यंत प्रवासीकोविड-१९ या महामारीपूर्वी वडसा रेल्वे स्टेशनवरून दररोज ८ पॅसेंजर गाड्या आणि आठवड्याला ६ अतिजलद  सुपरफास्ट गाड्या धावत होत्या.   ुपॅसेंजर गाड्यांमध्ये चांदाफोर्ट ते गोंदिया या प्रमुख गाडीचा समावेश होता. जलद गाड्यांमध्ये बिलासपूर-चेन्नई, यशवन्तपूर-कोरबा, दरभंगा-सिकंदराबाद या लांब पल्ल्याच्या व अतिजलद गाड्यांचा समावेश होता. वडसा रेल्वे स्टेशनवरून बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची संख्या दररोज १२०० ते  १५०० एवढी राहात होती. त्यातून दररोज अंदाजे  एक ते दिड लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत होते. सध्या त्या उत्पन्नापासून रेल्वेला वंचित राहावे लागत आहे. 

गजबजून राहणारे रेल्वे स्टेशन भकासनेहमी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यत गजबजून राहणारे वडसा हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक आज मात्र भकास वाटत आहे. हे स्टेशन मूक व शून्य नजरेने प्रवाशांची वाट पाहात आहे. सध्या या स्टेशनवर फक्त रेल्वे कर्मचारी आपली दैनंदिन कामे करीत असतात. अधूनमधून येणाऱ्या जाणाऱ्या मालगाडीचा हॉर्न तेवढा ऐकायला मिळतो. बाकी वेळ उदासीनता दिसत आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे