शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
4
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
5
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
6
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
7
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
8
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
9
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
10
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
11
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
12
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
13
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
14
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
15
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
16
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
17
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
18
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
19
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
20
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

लग्न वाहनाने वृध्देस चिरडले

By admin | Updated: May 30, 2015 01:57 IST

स्थानिक मातावॉर्डातील लग्न कार्यासाठी आलेल्या वाहनाने, मागे वळत असताना ६८ वर्षीय वृध्द महिलेस चिरडले.

महिलेचा जागीच मृत्यू : कुरखेडा येथे वाहनचालकाला अटक
देसाईगंज : स्थानिक मातावॉर्डातील लग्न कार्यासाठी आलेल्या वाहनाने, मागे वळत असताना ६८ वर्षीय वृध्द महिलेस चिरडले. डोक्याला जबर मार लागल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. धडक लागताच वाहनचालक फरार झाला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवीत त्याला कुरखेडा येथे अटक केली. सदर घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. नगरपालिका सभागृहात आयोजित लग्न समारंभासाठी कुरखेडा येथून नवरदेवाकरिता सदर वाहन आले होते.
स्थानिक नगर पालिका सभागृहात सकाळी ११ वाजता माधुरी ढवळे यांच्या मुलीचा लग्नसमारंभ आयोजित होता. कुरखेडा येथील नवरदेवाकरिता गाडी एमएच ४० एसी ५१२१ ही शहरात आली होती. लग्न दुपारी २ वाजता लागले. दारूची मौज भागविण्याकरिता वाहन चालक हेमंत घोगरे व नवरदेवाकडील मित्रमंडळी सोबत लगतच्या आंबेडकर वार्डात वाहनासह गेले होते. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान नगर परिषद शाळेसमोर वाहन मागे घेत असताना वाहन चालकाला वाहनामागे असलेली वृध्द महिला रूक्माबाई रामा गराडे (६८) रा. मातावार्ड देसाईगंज ही दिसली नाही व त्याने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, त्यात महिलेच्या डोक्याला जबर मार लागून ती जागीच गतप्राण झाली.
वॉर्डातील नागरिक तत्काळ गोळा झाले. भीतीने वाहनचालक हेमंत घोगरे (२७) रा. कुरखेडा हा कुरखेड्याकडे पळून गेला. सदर वाहन सजविलेले असल्याने ते लग्नाचे असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना माहिती देण्यात आली.
हेमंतला कुरखेडा येथून ताब्यात घेतले. वाहनचालकावर भादंविीया कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)