शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना याेद्धे दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी फ्रंटलाईन वर्कर व आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबत प्राधान्य देण्यात आले हाेते. जिल्ह्यात जवळपास २८ हजार फ्रंटलाईन वर्कर आहेत. यापैकी १२ मेपर्यंत एकूण २७ हजार २२८ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासूनचा कालावधी लक्षात घेतला तर या सर्वांना दुसरा डाेस मिळाला असता, मात्र अनेकांनी पहिला डाेस घेण्यास विलंब केल्याने दुसऱ्या डाेसची तारीख आली नसल्याने त्यांना दुसरा डाेस घेता आला नाही.

ठळक मुद्देअनेकांनी लस घेण्यास केला उशीर, प्राधान्य देऊनही केले दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्हाभरातील २७ हजार २२८ काेराेना याेद्ध्यांनी काेराेना प्रतिबंधात्मक लसचा पहिला डाेस घेतला आहे. त्यापैकी ११ हजार ७७४ याेद्ध्यांनी अजूनही दुसरा डाेस घेतला नाही. काही काेराेना याेद्ध्यांची दुसऱ्या डाेजची तारीख यायची आहे. त्यामुळे त्यांनी दुसरा डाेस घेतला नसला तरी अनेकांनी पहिला डाेस घेण्यास उशीर केल्याने त्यांना दुसऱ्या डाेसचे लसीकरण हाेऊ शकले नाही.देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी फ्रंटलाईन वर्कर व आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबत प्राधान्य देण्यात आले हाेते. जिल्ह्यात जवळपास २८ हजार फ्रंटलाईन वर्कर आहेत. यापैकी १२ मेपर्यंत एकूण २७ हजार २२८ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासूनचा कालावधी लक्षात घेतला तर या सर्वांना दुसरा डाेस मिळाला असता, मात्र अनेकांनी पहिला डाेस घेण्यास विलंब केल्याने दुसऱ्या डाेसची तारीख आली नसल्याने त्यांना दुसरा डाेस घेता आला नाही.काेराेनाच्या दुसऱ्या लाटेतही आराेग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना काम करावे लागत आहे. काेराेनापासून हाेणारा धाेका लक्षात घेता या वर्गाला प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बहुतांश जणांचे लसीकरणआराेग्य कर्मचारी व इतर विभागाच्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी आता पहिली लस घेतली आहे; मात्र दुसरी लस घेतली नाही. मध्यंतरी लसचा तुटवडा निर्माण झाला हाेता. तसेच काही जणांनी काेवॅक्सिन लस घेतली हाेती. ही लस मध्यंतरी उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळेही काही आराेग्य कर्मचाऱ्यांना दुसरी लस मिळाली नाही. 

जिल्ह्यात काेव्हिशिल्डचा सर्वाधिक पुरवठाशासनामार्फत सध्या काेव्हॅक्सिन व काेव्हिशिल्ड या दाेन लस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यात सुरूवातीपासूनच काेव्हिशिल्डचा सर्वाधिक पुरवठा केला जात आहे. आताही बहुतांश केंद्रावर काेव्हिशिल्ड हीच लस उपलब्ध आहे. काेव्हॅक्सिनचा पुरवठा अतिशय कमी आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या