वेलगूर येथे पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST2021-04-11T04:35:50+5:302021-04-11T04:35:50+5:30

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या वेलगूर येथे अद्यापही अंतर्गत पक्के रस्ते बांधण्यात आले नाही. वेलगूर येथील ...

Waiting for paved roads at Velgur | वेलगूर येथे पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा

वेलगूर येथे पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या वेलगूर येथे अद्यापही अंतर्गत पक्के रस्ते बांधण्यात आले नाही. वेलगूर येथील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीला अनेकदा नागरिकांनी कळविले.

ग्रामपंचायतीला प्राप्त निधीतून या भागात विकासकामे करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली. मात्र गावाच्या विकासासाठी प्राप्त होणाऱ्या निधीचा खर्च कोणत्या कामांवर केला जातो, अशी शंका गावातील अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या साेयीसाठी अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे. विशेष म्हणजे, वेलगूर परिसरातील अनेक गावांत अद्यापही अंतर्गत रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात आले नाही. पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागते, अशी बिकट स्थिती आहे.

Web Title: Waiting for paved roads at Velgur